Sushmita Sen: कमाल! हार्ट अटॅकनंतर एका आठवड्यातच सुश्मिताचं वर्कआऊट सुरू..व्हिडिओ पाहाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen Resumes Cardiologist-Approved Workout After Heart Attack nsa95

Sushmita Sen: हार्ट अटॅकनंतर एका आठवड्यातच सुश्मिताचं वर्कआऊट सुरू.. चाहते म्हणाले, तू तर..

Sushmita Sen: एरव्ही आपल्या फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेले अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या चर्चेत आहे ती तिच्या हार्ट अटॅक मुळे. काही दिवसांपूर्वीच तिला सेटवर हृदय विकाराचा झटका आला होता. या घटनेला एक आठवडा नाही तोवरच सुश्मिताचा वर्क आऊट व्हिडिओ समोर आला आहे. सध्या या व्हिडिओची प्रचंड चर्चा आहे.

(Sushmita Sen Resumes Cardiologist-Approved Workout After Heart Attack)

सुष्मिता सेनला 27 फेब्रुवारी रोजी सिनेमाच्या शुटींग दरम्यान सेटवरच हृदय विकाराचा झटका आला होता. तिला उपचारांसाठी तात्काळ मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या हृदयात 95 टक्के ब्लॉकेजेस होते. तिच्यावर लगेचच एन्जिओप्लास्टी करण्यात आली.

त्यानंतर सुश्मिताने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती चाहत्यांना दिली. यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार सांगत जीव वाचला म्हणून सर्वांचे आभारही मानले. आता पुन्हा तिने काही दिवसातच डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्यायाम सुरू केला आहे.

एका आठवड्यातच सुष्मितानं पुन्हा कमबॅक केल्याने सर्वांनाच आनंद झाला आणि धक्काही बसला आहे. सुष्मिता किती फिटनेस फ्रिक आहे हे सर्वांना माहिती आहेच. त्यामुके हार्ट अटॅकनंतर तिने लगेचच वर्कआऊट सुरू केलं आहे. सुष्मितानं होळीच्या शुभेच्छा देत व्यायाम करतानाचा फोटो शेयर केला आहे.

सुष्मितानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "व्हिल ऑफ लाइफ. माझ्या कार्डिओलॉजिस्टनं वर्कआऊट करायला परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरू केलं आहे. ही माझी हॅप्पी होळी होती आणि तुमची?,सर्वांना खूप खूप प्रेम" सोबत तिनं फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्ट्रेजिंग व्हिलवर योगा करताना दिसत आहे.

सुष्मिताचं हे स्पिरिट पाहून तिचं प्रचंड कौतुक होत आहे.  त्याचप्रमाणे अनेक जण तिच्या जिद्दीला देखील सलाम करत आहेत. तु कमाल आहेस, तुझ्याकडून खूप काही शिकायला हवं, प्रत्येक स्त्रीनं तुझ्यासारखी जिद्द ठेवली पाहिजे तर जग बदलेल.. अशा अनेक कमेंट तिला आल्या आहेत.

टॅग्स :sushmita sen