
Sushmita Sen: हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच आली कॅमेरा समोर, जीममध्ये जाण्याविषयी म्हणाली..
अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतेच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला होता. अचानक अभिनेत्रीबद्दल हे सगळं ऐकून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. आता पहिल्यांदाच सुष्मिता सेनने लाईव्ह येऊन आपली अवस्था दाखवली. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले.
आता ती बारी असल्याचे तिने सांगितले. आजकाल तिला व्हायरल झाले आहे आणि त्यामुळेच तिचा घसा खवखवतोय. तिला थोडं अस्वस्थ वाटत आहे. चला तर मग पाहुयात तब्येतीचे अपडेट देताना तिने कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत.
सुष्मिता सेन म्हणाली की, आजकाल अनेकांनी मला माझ्या स्थितीबद्दल विचारले. सर्वांचे खूप आभार. सगळ्यांनी खूप मेसेज आणि कॉल्स केले. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्या सर्वांचे आभार. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला.
मिस्टर अँड मिसेस माधवानी, सिया, पंकज असे अनेक नावं या लाईव्हमध्ये तिने घेतली. तसेच कुटुंबीय व डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. माझ्या गोपनीयतेची काळजी घेणार्या लोकांचेही मी आभार मानते, असे ती म्हणाली.
इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान सुष्मिताच्या डोळ्यात पाणी आले. ती टिश्यू पेपरच्या मदतीने डोळे पुसत होती. ती म्हणाली की, जेव्हा तिला नानावटी रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा मी तेथे दाखल असल्याचे कोणालाही कळू दिले नाही.
त्यावेळी सर्वांना कळावे असे मला वाटत नव्हते. त्यामुळे तिने डॉक्टरांसह सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सुष्मिता सेन म्हणाली की, मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. मी लवकरच बरी होऊन आर्या ३ च्या सेटवर परतेन.
सुष्मिता सेनने जिम आणि वर्कआउटचाही उल्लेख केला. तिला फिटनेसचा फायदा झाल्याचे तिने सांगितले. माझ्या हृदयाच्या ९५ टक्के भागात ब्लॉकेज झालं होतं. तसेच जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे बरे होण्यास मदत झाली आहे.
ती म्हणाली की, आजकाल अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. मला या सर्वांना सांगायचे आहे की, त्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर लक्ष ठेवा.