बर्थडे स्पेशल: 'या' प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 19 November 2020

१९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेनचा आज १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. सुष्मिताने १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘दस्तक’ या सिनेमातून अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली.

मुंबई -अभिनयासोबत एक फिटनेस आयकॉन म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेनचा आज १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. सुष्मिताने १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘दस्तक’ या सिनेमातून अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ‘सिर्फ तुम’, ‘बीवी नंबर १’, ‘ऑंखे’, ‘मैं हू ना’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सुष्मिताने हिंदीसोबत तमिळ आणि बंगाली सिनेमात काम केलं आहे.

हे ही वाचा: ‘दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली’ म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव    

दोन मुलींची आई असलेल्या सुष्मिताने लग्न केलं नसलं तरी गेले काही दिवस ती मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असून लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गीय घरातील मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता आईने आणि मीना बाजारातील एक टेलर यांनी मिळून शिवले होते. सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतलं. तिच्या या निर्णयाचं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं.

Sushmita Sen reveals how her first interaction with boyfriend Rohman Shawl  happened by mistake - bollywood - Hindustan Times

सुष्मिताने 'मिस युनिव्हर्स' ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली असं नेहमी म्हटलं जातं. या स्पर्धेत सुष्मिताचा सामना ऐश्वर्या रॉय सोबत होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघींनाही एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? हा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर ऐश्वर्याने उत्तर दिलं, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने इंदिरा गांधी यांचा मृत्यू असं उत्तर दिलं. या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता. सुष्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतः कविता करते. सुष्मिताने हिंदी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. 

sushmita sens miss universe answer that won the world on throwback thursday 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushmita sens miss universe answer that won the world on throwback thursday