ही अभिनेत्रीही करणार 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी लग्न

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी त्यांच्यामधील वयाचं अंतर बाजूला ठेवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्यापेक्षा लहान वयाच्या प्रियकराशी लग्नगाठ बांधणार आहे.

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी त्यांच्यामधील वयाचं अंतर बाजूला ठेवून लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री आपल्यापेक्षा लहान वयाच्या प्रियकराशी लग्नगाठ बांधणार आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. सुष्मिता वयाच्या 42व्या वर्षी तिचा प्रियकर रोहमन शॉलबरोबर लग्न करत आहे. रोहमन सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. सुष्मिता-रोहमन सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो सतत शेअर करत असतात.

sushmita sen

गेल्या एक ते दोन वर्षापासून हे दोघं एकमेकाला डेट करत आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये सुष्मिता-रोहमन लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय रोहमन सुष्मिताच्या रेनी आणि अलिशा या दोन्ही मुलींबरोबरही वेळ घालवताना दिसतो. आता सुष्मिता तिच्या या लग्नाबाबत कधी खुलासा करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushmita singh will get marries with her boyfriend Rohman Shawl