जगभरात नावाजलेली 'हॉस्टेजेस' वेबसिरीज खास मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Monday, 13 April 2020

ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेबसिरीज हा लोकांकडे सध्या उत्तम पर्याय आहे..आणि म्हणूनंच अशीच एक सस्पेन्स थ्रीलर वेबसिरीज आजपासून तुमच्या भेटीला आली आहे..विशेष म्हणजे ही वेबसिरीज तुम्हाला तुमच्या टीव्हीवरील दररोजच्या वाहिनीवर पाहता येणार आहे.. 

मुंबई- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे..त्यामुळे कोरोना व्हायरससोबत जर लढायचं असेल तर घरातंच राहणं महत्वाचं आहे..सतत एवढे दिवस घरात राहुन घरातील मंडळी बोअर होतात..शूटींग्स बंद असल्याने टीव्हीवरही काही नवीन पाहता येत नाही त्यामुळे अनेक हिंदी-मराठी वाहिन्यांनी काही जुन्या कार्यक्रमांच पुनःप्रक्षेपण सुरु केलं आहे तर यासोबतंच लोक डिजीटल माध्यमाकडे वळलेही पाहायला मिळत आहेत..ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेबसिरीज हा लोकांकडे सध्या उत्तम पर्याय आहे..आणि म्हणूनंच अशीच एक सस्पेन्स थ्रीलर वेबसिरीज आजपासून तुमच्या भेटीला आली आहे..विशेष म्हणजे ही वेबसिरीज तुम्हाला तुमच्या टीव्हीवरील दररोजच्या वाहिनीवर पाहता येणार आहे.. 

रिव्ह्यु: एक थी बेगम वेबसिरीज 

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. १३ एप्रिल म्हणजेच आजपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे 'हॉस्टेजेस' ही वेब सीरिज...जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजची 'हॉस्टेजेस' ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

'हॉस्टेजेस' ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अश्या डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार ? याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे 'हॉस्टेजेस' ही वेबसीरिज. 

Hotstar Specials announces new web series Hostages with a trailer ...

सुधीर मिश्रा दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये रोनित रॉय, टिस्का चोप्रा, परवीन डबास, दलीप ताहिल, मोहन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मनोरंजनाचा हा खजिना तुम्हाला अनुभवायचा असेल तर १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर 'हॉस्टेजेस' वेबसिरीजचा हा उत्तम पर्याय आहे..  

suspense thriller hostages webseries now in marathi  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspense thriller hostages webseries now in marathi