अभिनयाबरोबरच झळकतीये सुयशची शिल्पकला! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ऑनस्क्रीन अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत वावरणारा सुयश खऱ्या आयुष्यात फार कलाप्रेमी आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलनंतर सुयशला मिळालेल्या फावल्या वेळात चित्र काढायला आणि चिकनमातीपासून शिल्पकला तयार करायला आवडते.

चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांची मने जिंकणारा अभिनेता सुयश टिळक सध्या झी युवा वाहिनीवर "बापमाणूस' मालिकेत सूर्याची भूमिका साकारतोय. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं सगळीकडे खूप कौतुक होतंय.

ऑनस्क्रीन अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत वावरणारा सुयश खऱ्या आयुष्यात फार कलाप्रेमी आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलनंतर सुयशला मिळालेल्या फावल्या वेळात चित्र काढायला आणि चिकनमातीपासून शिल्पकला तयार करायला आवडते. नुकतीच सुयशनं चिकनमातीपासून घुबडाची कलाकृती बनवली आणि त्याचे फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केलेत. चाहत्यांनी हे फोटो पाहून त्याचे खूप कौतुक केले.

suyash tilak

याबाबत सुयश म्हणाला, "मला कलेची खूप आवड आहे. त्यातून मी स्वतःला व्यक्त करतो. मला चित्र काढायला व मातीपासून आगळीवेगळी शिल्पकला साकारायला आवडते. दिवस-रात्र चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे जेव्हा मला फावला वेळ मिळतो, तेव्हा मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो आणि माझी आवड जोपासतो.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suyash s art of clay viral on social media