अंजलीबाईंचा साखरपुडा? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

एकीकडे अनुष्का शर्मा व विराट कोहली यांनी कुणालाही न सांगता इटलीत गुपचुप लग्न केल्यानंतर आता "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अंजलीबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधरच्या आयुष्यातील खरा "राणा' म्हणजेच सुयश टिळक यांनीही गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून त्यांचं अफेयर असल्याची चर्चा सुरू होती. सुयशनं त्या दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात अक्षयाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसतेय. त्या फोटोसोबत सुयशनं लिहिलंय की, "सर्वत्र प्रेम, सकारात्मकता आणि आनंद पसरवा'.

एकीकडे अनुष्का शर्मा व विराट कोहली यांनी कुणालाही न सांगता इटलीत गुपचुप लग्न केल्यानंतर आता "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अंजलीबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधरच्या आयुष्यातील खरा "राणा' म्हणजेच सुयश टिळक यांनीही गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून त्यांचं अफेयर असल्याची चर्चा सुरू होती. सुयशनं त्या दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात अक्षयाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसतेय. त्या फोटोसोबत सुयशनं लिहिलंय की, "सर्वत्र प्रेम, सकारात्मकता आणि आनंद पसरवा'. त्यांच्या याच पोस्टमुळे दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे; मात्र या केवळ अफवा असल्याचं त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून समजतंय. 

Web Title: suyash tilak and akshaya deodhar engagement