"शॉक कथेत अभिनेता सुयश टिळक स्त्री"भूमिकेत!!

टीम इ सकाळ
रविवार, 25 जून 2017

व्हायरस मराठीच्या आगामी गेट टूगेदर व्हिडीओ मध्ये अभिनेता सुयश टिळकनं स्त्री पात्र साकारलं आहे.गेट टू गेदरसाठी जमलेल्या व्हायरस मराठीच्या सर्व सात  अभिनेत्यांना दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सात भूमिका सादर करण्याचं आवाहन दिलं होतं, त्यात सुयश नं तरुण घरंदाज स्त्रीचं रूप घेऊन छान सादरीकारण केलं आहे.

मुंबई : व्हायरस मराठीच्या आगामी गेट टूगेदर व्हिडीओ मध्ये अभिनेता सुयश टिळकनं स्त्री पात्र साकारलं आहे.गेट टू गेदरसाठी जमलेल्या व्हायरस मराठीच्या सर्व सात  अभिनेत्यांना दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सात भूमिका सादर करण्याचं आवाहन दिलं होतं, त्यात सुयश नं तरुण घरंदाज स्त्रीचं रूप घेऊन छान सादरीकारण केलं आहे.

आजवर पडद्यावर अनेक पुरुष कलाकारांनी स्त्री भूमिका करण्याचं आवाहन स्विकारलं आहे,सुयश नं ही हे आवाहन स्विकारलं असून त्याची लूक टेस्ट या व्हिडीओ मध्ये करण्यात आली आहे.
समीर पाटील यांनी जादुगार, शर्मिला शिंदे यांनी भिकारीण,छाया कदम यांनी पुरुष,रिचा अग्निहोत्री यांनी चेटकीण, अक्षय शिंपी याने वेडा, तर चैतन्य सरदेशपांडे याने गोवन तरुण असे पात्र साकारलेले आहे.

शॉक कथेच्या सर्व कलावंतांनी एकत्र येऊन केलेल्या गेट टुगेदर मध्ये प्रत्येकाने अशा विविध रुपात आपली आपली सादारीकरणं केली आहेत.या प्रत्यकाने केलेल्या ऑडिशन च्या सादरीकरणाला लिखाणाचं सूत्र देण्याचं काम लेखक मुकेश माचकर यांनी केलं आहे.

ऑसम टूसम हा ट्रॅव्हल शो आणि शॉक कथा या दोन मालिका सध्या व्हायरस मराठीवर दिसत आहेत.व्हायरस मराठीच्या व्हिडीओज ना यू ट्यूबवर उत्तम प्रतिसाद मिळत असून तरुणा च्या कडून चांगली पसंती मिळते आहे. श्रीधर चिटणीस आणि संतोष कोल्हे हे या व्हिडीओज ची निर्मिती करत आहेत.

Web Title: Suyash tilak in a diffrent roll