हजार मुलींशी संभोग करेन- स्वामी ओम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबईः 'बिग बॉस-10' मधून वादग्रस्त होऊन बाहेर पडलेले स्वामी ओम यांचा एका बिकनी घातलेल्या मॉडेलसोबतचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला असून, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वामी ओम दिसत असून, बिकनी घातलेली मॉडेलसोबत ते नृत्य करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ हा आगामी एका चित्रपटामधील दृश्य असल्याचे स्वामी ओम यांनी सांगितले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी स्वामी ओम यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे. स्वामींसमोर एक मॉडेल बिकनी घालून नृत्य करत आहे, हे स्वामींना कसे चालू शकते? सन्यासी असल्याचे विसरले आहेत का?

एका वृत्तवाहिनीने स्वामी ओम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तुम्ही जे काही पाहिले ते तर काहीच नाही. मी ठरवले तर शारीरिक संभोग करून एका वेळेला हजार मुलींना थकवेल. परंतु, माझ्या इंद्रियांवर माझे संपुर्ण नियंत्रण आहे.'

स्वामी ओम यांनी वृत्तवाहिनीशी लाईव्ह बोलताना बिग बॉसमधील अनुभवासह अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Web Title: swami om getting a lap dance from bikini clad model