स्वप्नील जोशी करतोय हॅारर फिल्म

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मुंबई : प्रेम, रोमान्स आणि कॅामेडी सारख्या चित्रपटातून मराठीतील चॅाकलेट बॅाय अशी ओळख मिळालेला स्वप्नील लवकरच एका हॅारर चित्रपटात दिसणार आहे. 'बळी' असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.  स्वप्नीलने हे पोस्टर समाज माध्यमावर शेअर केले आहे. 

हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत आहेत. त्यांनी याआधी 2016 मध्ये लपाछपी हा मराठी हॅारर चित्रपट दिग्दर्शित केला होता. तसेच बळी या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार करणार आहेत.

या चित्रपटाबद्दल स्वप्नीलला विचारले असता, मी स्वत: हॅारर फिल्मस पाहताना
फार घाबरतो त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी एक चँलेज असणार आहे, असे त्याने सांगितले.

web title : Swapnil Joshi is doing horror film Bali 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swapnil Joshi is doing horror film Bali