स्वप्नील जोशीचा नवा स्त्री अवतार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी त्याच्या आगामी "फुगे' या चित्रपटात स्त्री अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्नीलने या चित्रपटात एका सीनसाठी लाल रंगाचा टॉप, लिपस्टिक तसेच कानातले असा स्त्री वेश धारण केला आहे. 

कथानकाची गरज म्हणून अनेक कलाकारांनी स्त्री वेशभूषा केल्या आहेत. मराठीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे यांनी यापूर्वी कथानकाची गरज म्हणून स्त्री वेश धारण केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिषेक बच्चन, शर्मन जोशी, रितेश देशमुख यांनीही स्त्री वेशभूषा केलेल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वप्नील "फुगे' चित्रपटासाठी स्त्री वेश धारण करणार आहे. "कोणत्याही अभिनेत्याला आपली कला सादर करण्यासाठी चित्रपटाची कथा अधिक महत्त्वाची असते. जर कथेची गरज असेल तर तसा पेहराव आणि भूमिका अपरिहार्य असते. लोकांना हसवण्यासाठी किंवा विनोदाचा भाग म्हणून नव्हे तर कथानकाची गरज ओळखून मी ही भूमिका करण्यास तयार झालो,' असे स्वप्नीलने सांगितले. "कॉमेडी सर्कसमध्ये मी यापूर्वी स्त्री पात्र साकारले होते. त्यामुळे ही भूमिका करताना मला कोणताही त्रास झाला नाही. चित्रपटात स्त्री भूमिका करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे, असेही तो म्हणाला. 
"फुगे' या चित्रपटाची निर्मिती अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार, अश्‍विन आंचन, अनुराधा जोशी यांनी केली असून, दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे यांनी केले आहे. हा चित्रपट मैत्री आणि प्रेम याच्यावर भाष्य करणारा आहे.  

Web Title: swapnil joshi in traditional womens wear