पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा, व्हिडिओ व्हायरल : स्वराची कमेंट

पंजाब मधील राजकीय वादळ आता शमलं आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री पदी चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांची निवड झाली आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा, व्हिडिओ व्हायरल : स्वराची कमेंट

मुंबई - पंजाब मधील राजकीय वादळ आता शमलं आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री पदी चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांची निवड झाली आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात ते चक्क भांगडा (Punjab CM Bhangra Dance) करताना दिसत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री इतक्या सुंदरपणे भांगडा करत आहेत की पाहणाऱ्यांनी त्यांचं कौतूक केलं आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केलं आहे. त्या व्हिडिओवर अभिनेत्री स्वरा भास्करनंही व्टिट करुन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तिनं त्यावर एक इमोजीही शेयर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता असल्याचे दिसुन आले होते. कॉग्रेसमधील अंतर्गत कलह यानिमित्तानं समोर आला होता.

मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ पाहून आता कित्येकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. स्वरानं लिहिलं आहे की, स्वीट....याशिवाय तिनं एक इमोजीही शेय़र केला आहे. स्वराच्या त्या व्टिटवर तिला अनेकांनी रिअॅक्शनही दिली आहे. त्या व्हिडिओला पंजाब मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं शेयर करण्यात आले आहे. तो व्हिडिओ शेयर करताना लिहिले आहे की, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, गुजराल पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत भांगडा नृत्याचा आनंद घेतला. कपुथला येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पिवळ्या रंगाचा पगडी आणि सफेद रंगाचा कुर्ता- पायजमा परिधान करुन त्यांनी हे नृत्य केलं आहे. एएनआयनं देखील हा व्हिडिओ व्टिट केला आहे. यापूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री पदी कॅप्टन अमरिंदर सिंग हे होते. त्यांच्यानंतर चरणजीत सिंग यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धूरा देण्यात आली आहे. ते पंजाबमधील चमकौर साहिब विधानसभेतून निवडून आले आहे. त्या व्हिडिओनंतर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असल्याचे दिसुन आले आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा, व्हिडिओ व्हायरल : स्वराची कमेंट
सुष्मिताच्या 'आर्या'ला एमीचं नामांकन : नवाझुद्दीनचाही समावेश
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा, व्हिडिओ व्हायरल : स्वराची कमेंट
ओळखा पाहू हा अभिनेता कोण? : 'सरदार उधम' मधला कडक लूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com