"अनारकली' सर्वांना आवडेल 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

माझा आगामी "अनारकली ऑफ आराह' हा चित्रपट सामान्य व दर्दी अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे,असा दावा अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केला. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्या प्रसंगी बोलताना स्वरा म्हणाली, की रिक्षाचालकांपासून उच्च वर्गातील प्रेक्षकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट सर्वांना आवडेल असा आहे. बिहारमधील आराह गावातील अनारकली या गायिकेची कथा"अनारकली ऑफ आराह'दिसणार आहे. ही गायिका द्विअर्थी गाणे म्हणत असते.

माझा आगामी "अनारकली ऑफ आराह' हा चित्रपट सामान्य व दर्दी अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे,असा दावा अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केला. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्या प्रसंगी बोलताना स्वरा म्हणाली, की रिक्षाचालकांपासून उच्च वर्गातील प्रेक्षकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट सर्वांना आवडेल असा आहे. बिहारमधील आराह गावातील अनारकली या गायिकेची कथा"अनारकली ऑफ आराह'दिसणार आहे. ही गायिका द्विअर्थी गाणे म्हणत असते. एकदा समाजात वजन असलेल्या व्यक्तीकडून तिचा विनयभंग होतो आणि तेथून पुढे अनारकलीचा लढा सुरू होतो, अशी साधारण या चित्रपटाची कथा 
आहे. यात गायिकेची भूमिका स्वराने केली आहे. अनारकलीच्या धाडसाची ही कथा रंजक पद्धतीने मांडली आहे, असे स्वराने सांगितले. 
 

Web Title: swara bhaskar in anarkali