वस्त्रहरणावेळी द्रौपदीवर बळजबरी होताना शासनकर्ते गप्प होते, आजही तेच..

बॉलीवूड मध्ये स्वतःच्या अभिनयाने आणि विषयाच्या निवडीने स्वतःचे वेगळेपणे सिद्ध करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हीचा आज वाढदिवस. ती तिच्या वादग्रस्त विधानाने कायमच चर्चेत असते. न नुकतेच तिने हिजाब प्रकरणावर वादग्रस्त विधान केले होते...
swara bhaskar tweets
swara bhaskar tweets sakal

BOLLYWOOD NEWS : बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने हिंदी सिनेसृष्टीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेच पण त्याचबरोबर इतरही बाबतीत ती कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. सिनेसृष्टी वगळता ती इतर विषयात तिचे परखड मत ठामपणे व्यक्त करत असते. त्यामुळेही ती कायम चर्चेत असते.आज ती तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करतेय.

स्वरा तिच्या अभिनयातून अनेकांच्या हृदयावर राज करत असते यात काही वाद नाही. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टविषयी असो वा मग यूट्यूब वरील तिच्या वायरल बोल्ड लुकविषयी असो, चाहत्यांना कायम उत्सुकता असते. त्यामुळे तिच्या पोस्टला चाहत्यांच्या भरघोस प्रतिक्रिया उमटतात.तर दुसऱ्या बाजूला तिच्या वादग्रस्त ट्विट्समुळेही ती सतत चर्चेत असते.

जाणून घ्या स्वराच्या काही उघड वक्तव्यांबाबत

काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये स्वराने द्रौपदीच्या वस्त्रहरणाची तुलना चक्क हिजाब वादाशी केली होती. त्यात तिने लिहिले की, “महाभारतात द्रौपदीचे वस्त्र बळजबरीने काढण्यात आले होते आणि सभेत बसलेले जबाबदार, सत्ताधारी , कायदा करणारे फक्त बघत बसले… आज त्याची आठवण झाली.” तिने हिजाब प्रकरणाविषयी सहानुभूती दाखवत शासनकर्त्यांवर टिका करत खालील ट्विट केले होते.

swara bhaskar tweets
Swara Bhaskar : प्रेम विसरत चाललेल्या देशाला 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा

एवढेच नाही तर 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, या अभिनेत्रीने पाकिस्तानची निंदा केली होती. याउलट २०१५ मध्ये जेव्हा तिने पाकिस्तानला भेट दिली तेव्हा ती म्हणाली होती की तिने आतापर्यंत भेट दिलेला हा सर्वोत्तम देश आहे आणि तिथल्या मुलाखतींमध्ये तिचे कौतुक गेले केले. तिच्या या वादग्रस्त टिप्पण्यांनी सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.एवढेच नव्हे तर स्वरा अनेक विषयांवर अनावश्यक नाकखुपसणी करत असते असेही अनेकांचे म्हणणे आहे.

तिने पद्मावत या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्सारी यांना थेट पत्र लिहून करन जौहरचा गौरव केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली होती त्यावेळी सोशल मीडियावर तिच्या वक्तव्याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच अनेकांनी स्वरा निरर्थक गोष्टींवर बोलून कॉंट्रोव्हरसिला निमंत्रण देत असते अशाही टीका तिच्यावर केल्यात.

सगळ्या कॉंट्रोव्हरसिज बाजूला सोडल्या तर स्वरा चित्रपटांतील अभिनयात अनेकांना मागे टाकते यात काहीच शंका नाही.'रांझना' मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 'तनु वेड्स मनू' आणि 'प्रेम रतन धन पायो' या २०१५ मधील सर्वाधिक कमाई करणार्बॉरे बॉलीवूड चित्रपट होते त्यात स्वराचा अभिनय होताच त्याचबरोबर तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) स्क्रीन अवॉर्ड जिंकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com