सब्र का फल... 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

बॉलीवूडचा किंग म्हणजेच आपला शाहरूख खान. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करतोय. आनंद एल. राय ज्यांनी "रांझणा', "तनू वेड्‌स मनू'सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत; त्यांच्या चित्रपटात तो एका बुटक्‍याची भूमिका करताना दिसणार आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्याबरोबर काम करायचं कोणत्या हिरोईनला आवडणार नाही? अशा संधीची मोठी असो वा नवखी असो सगळ्याच हिरोईन्स आतुरतेने वाट पाहत असतात. मग स्वरा भास्करही याला अपवाद नाही. आनंद एल. राय यांच्या "रांझणा', "तनू वेडस्‌ मनू' या चित्रपटात स्वराने काम केलं आहे. ती आनंद एल.

बॉलीवूडचा किंग म्हणजेच आपला शाहरूख खान. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करतोय. आनंद एल. राय ज्यांनी "रांझणा', "तनू वेड्‌स मनू'सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत; त्यांच्या चित्रपटात तो एका बुटक्‍याची भूमिका करताना दिसणार आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्याबरोबर काम करायचं कोणत्या हिरोईनला आवडणार नाही? अशा संधीची मोठी असो वा नवखी असो सगळ्याच हिरोईन्स आतुरतेने वाट पाहत असतात. मग स्वरा भास्करही याला अपवाद नाही. आनंद एल. राय यांच्या "रांझणा', "तनू वेडस्‌ मनू' या चित्रपटात स्वराने काम केलं आहे. ती आनंद एल. राय यांच्याकडे त्यांच्या आगामी चित्रपटात एखादा रोल मागण्यासाठी गेली आणि तिनं सांगितलं की, शाहरूखच्या ऑपोझिट रोल असेल तरच मला द्या. त्याच्या बहिणीचा किंवा मुलीचा रोल मला करायचा नाही. पण आनंद एल. राय तिला फक्त शाहरूखच्या आईचा रोल ऑफर करू शकले आणि स्वराचं स्वप्न अधुरंच राहिलं. पण स्वरा, तुझं करियर तर आताच सुरू झालंय. आणखी अनेक संधी तुला मिळतील. सब्र का फल मिठा होता है स्वरा... 

Web Title: Swara Bhaskar refuses to play Shah Rukh Khan’s mom in Aanand L Rai’s next