'आठ वर्षाच्या मुलीचा मंदिरात बलात्कार झाला तेव्हा राग आला नाही का ?'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

एका किसिंगच्या दृश्यावर काही राजकीय, धार्मिक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती मालिका वादाच्या भोव-यात सापडली आहे.

मुंबई - विक्रम सेठ लिखिल आणि मीरा नायर दिग्दर्शित अ सुटेबल बॉय मालिकेवरुन मोठा वाद समोर आला आहे. या मालिकेतील एका भागात मंदिरात किसिंगचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. यावरुन काही संघटनांनी आक्षेप घेऊन नेटफ्लिक्सवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

यावर सोशल मीडियातूनही त्या मालिकेच्या निर्माते व दिग्दर्शक यांच्यावर टीका करण्याच आली होती. यासगळ्या प्रकरणात अभिनेत्री स्वरा भास्करने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.मंदिरातील किसिंग सीनवर स्वराने त्या सीनला विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले आहे. यावेळी तिनं कठूआ बलात्कार प्रकरणाची आठवण विरोधकांना करुन दिली आहे.

बीबीसीची निर्मिती असलेल्या अ सुटेबल बॉय या मालिकेला जाणकार प्रेक्षक, अभ्यासक यांची पसंती मिळाली आहे. मात्र त्यातील एका किसिंगच्या दृश्यावर काही राजकीय, धार्मिक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती मालिका वादाच्या भोव-यात सापडली आहे. यासगळ्याचा परिणाम म्हणजे ती मालिका प्रसारित करणा-या नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याची मागणी त्या संघटनांनी केली आहे.

यासगळ्या प्रकरणावर आगपाखड करताना स्वरा भास्कर म्हणाली, जे लोकांनी त्या मालिकेला लक्ष्य केलं आहे त्यांनी कठुआच्या सामुहिक बलात्काराचे उदाहरण दिले आहे.  त्यावेळी तेथील मंदिरात एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हा तुमचा राग कुठे गेला होता असा प्रश्न तिने टीका करणा-यांना विचारला आहे. मात्र यानंतर स्वराला नेटक-यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्यावर टीका करुन धारेवर धरले आहे.

साधारण महिन्यापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘अ सुटेबल बॉय’ ही वेब सीरिज मागील महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेली ही मालिकेचा वाद संपत नाही. आता त्यात अभिनेत्री स्वरा भास्करवर जोरदार टीका केली जात आहे.  अनेकांनी या सीरिजवर आक्षेप घेत बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.  तिने केलेल्या वक्तव्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट अ सुटेबल बॉय हा हॅशटॅक ट्रेण्ड होत आहे. 

'कपडे काळेच हवेत कारण ती काळी आहे'; शाळेत मुलं तिला चिडवायची

“ कठुआमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीवर मंदिरात सामुहिक बलात्कार करण्यात आला त्यावेळी जर रागाने तुमचं रक्त उसळलं गेलं नसेल आणि  संताप आला नसेल तर आता मंदिरात झालेल्या किसिंग सीनविषयी बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये”, असं ट्विट स्वराने केलं.  मंदिर हे धर्मनिरपेक्षता किंवा भावना व्यक्त करण्याची जागा नाहीये. ही पूजा करण्याची जागा आहे त्यामुळे त्या जागेचं पावित्र्य आणि आदर ठेवला जायला हवा. असे वाटते. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.

हे ही वाचा: शेहनाज बनली सिद्धार्थची 'शोना', रिलीज झाल्यावर टॉप ट्रेंडमध्ये पोहोचलं गाणं

 एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी दृश्ये चित्रपट दिग्दर्शक तयारच का करतात’?आम्ही कोणताही धर्म, जात पाहून कृती करत नाही. तुमच्यासारखे कम्युनिस्ट लोकंच प्रत्येक गोष्टीत धर्म आणि जात मध्ये आणता’,  या शब्दांत दुस-या नेटक-याने स्वरावर टीका केली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swara bhaskar said if there was no rage in the temple when Kathua gang raped?