नवरा मुस्लिम.. पण स्वराचं लग्न अखेर हिंदू पद्धतीनं.. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सजली नवरी Swara Bhaskar Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhaskar Wedding

Swara Bhaskar Wedding: नवरा मुस्लिम.. पण स्वराचं लग्न अखेर हिंदू पद्धतीनं.. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये सजली नवरी

Swara Bhaskar Wedding: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत दिसते. अभिनेत्री आपल्या सिनेमां व्यतिरिक्त बेताल वक्तव्यांमुळे देखील अनेकदा चर्चेत येते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय पहायला मिळते.

सध्या मात्र स्वरा चर्चेत आहे ते तिच्या लग्नामुळे. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. तर आता अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे आणि प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी जवळचेच काही नातेवाईक आणि मित्र-परिवार यांच्या उपस्थितीत आपलं पारंपरिक लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो स्वरा भास्करनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केले आहेत.(Swara Bhaskar South Indian Wedding Photo viral)

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांचं लग्न मोठ्या धामधूमीत पार पडलं. पण हैराण करणारी गोष्ट एक समोर आली आहे की स्वरानं आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नसून ते इन्स्टा स्टोरीत शेअर केले आहेत. यामध्ये ती मेहरून आणि गोल्डन कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिनं यासोबत मेहरुन ज्वेलरी देखील परिधान केलेली आहे.

हाताला मेहेंदी,लाल चूडा,नाकात नथ,माथ्यावर पट्टी आणि केसात गजरा घालून स्वरा खूपच सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे फहादनं स्ट्रिप्ड असलेला सफेद कुर्ता आणि त्यावर गोल्डन नेहरु जॅकेट घातला आहे.

रिपोर्ट्सनुसार कळत आहे की स्वरा भास्करनं आपल्या लग्नात जी साडी नेसली आहे त्याची किंमत जवळपास ९४,८०० रुपये आहे.

हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

स्वरा भास्करचा प्री-वेडिंग सोहळा १२ मार्च रोजी पार पडला,ज्यात हळदी समांरभ आणि मेहेंदी काढण्याचे कार्यक्रम सामिल होते. दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा होता..आणि आता लग्नाची सप्तपदी देखील पार पडली आहे.

आता १५ मार्च रोजी एक कव्वाली समारंभ पार पडणार आहे. त्या समांरभात देखील जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार सामिल होईल.

१६ मार्च रोजी रीसेप्शन सोहळा पार पडेल. लग्नाच्या फोटो दरम्यानच स्वराच्या मेहेंदी आणि हळदी समारंभाचे फोटो देखील समोर आले आहेत.

मेहेंदीला स्वरानं हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यावर फ्लोरल एम्ब्रॉयडरी केली गेली होती, तर स्वरा भास्करनं संगीत सोहळ्याला ऑरेंज कलरचा अनारकली सूट परिधान केला होता.ज्यात ती खूपच शोभून दिसत होती.