
स्वरा दी वेडिंग! 1 कोटींची साडी तर लाखांचं मंगळसूत्र...चर्चा तर होणारच
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तिनं पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं.आपल्या नव्या आयुष्याची सुरुवातही केली.
आधी स्वराने स्पेशल मॅरेज कायद्याअंतर्गत समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिनं तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला. त्यांनतर तिनं पारंपारिक पद्धतिनेही लग्न करणार असल्याच सांगितलं आणि त्यांचीही जोरदार तयारी सुरु केली.
दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्सही पूर्ण झाले. हा विवाह खूप खास होता, या लग्नात ना सप्तपदी झाल्या ना निकाह झाला. मात्र, लग्नात होणारे इतर प्रत्येक विधी थाटामाटात पार पडले.
लग्नाच्या दिवशी स्वराच्या हातावर मेहेंदी, लाल चूडा,नाकात नथ,माथ्यावर पट्टी आणि केसात गजरा घालून स्वरा खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे फहादनं स्ट्रिप्ड असलेला सफेद कुर्ता आणि त्यावर गोल्डन नेहरु जॅकेट घातला होता.
स्वराने याआधीच सांगितले होते की तिचे लग्न साधेपणाने होणार आहे. पण तिचा साधेपणाही काही साधा नव्हता. वास्तविक स्वरा भास्करची वधूची साडी ही काही सामान्य साडी नव्हती. ही साडी रॉ मँगो कंपनीची होती. या साडीची किंमत जवळपास 94,800 रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. या वृत्तावर विश्वास ठेवला तर स्वराने जवळपास 1 कोटी किमतीची साडी नेसली आहे.
स्वराच्या लग्नात तिचे वडील उदय भास्कर यांनी आंध्र प्रदेशची परंपरा पाळली. तिथे केल्या जाणाऱ्या विधींमध्ये नववधूला पिवळ्या धाग्याने किंवा सोन्याच्या धाग्याचे मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राच्या या प्रकाराला वाटी असेही म्हणतात. स्वराच्या मंगळसूत्राची किंमत लाखोंमध्ये असल्याचं बोललं जात आहे. हे मंगळसूत्र स्वराला शोभुन दिसत होतं.
स्वरा भास्करच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच आता तिच्या पाठवणीचा व्हिडिओही समोर आलायं. या व्हिडिओत स्वरा खुपच भावुक झालेली दिसतेय. तर तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत.