Swara Bhaskar Wedding: भाऊ भाऊ म्हणाली कोर्टात जाऊन त्याच्याशीच लग्न करून आली! स्वरा तुला मानलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 swara bhaskar, swara bhaskar wedding, swara bhaskar husband

Swara Bhaskar Wedding: भाऊ भाऊ म्हणाली कोर्टात जाऊन त्याच्याशीच लग्न करून आली! स्वरा तुला मानलं...

Swara Bhaskar Wedding News: रांझणा, तनु वेड्स मनु, निल बटे सन्नाटा अशा सिनेमांमधून जिने तिच्या अभिनयच ठसा उमटवला अशी स्वरा भास्कर. स्वराने काल गुपचूप कोर्ट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

पण स्वराने आधी तिच्या नवऱ्याला भाऊ मानलं होतं. हो.. बरोबर वाचताय. स्वराने तिचा नवरा फहादला आधी भाऊ मानलं होतं. लग्न झाल्यावर स्वराचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय.

(swara bhaskar troll because before marriage swara bhaskar caliing her husband brother)

फहादचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा स्वरा शुभेच्छा देताना म्हणाली होती कि.. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा फहाद मियाँ! भाऊ तुमचा आत्मविश्वास अबाधित ठेवा, फहाद अहमद सुखी राहा, सेटल व्हा.. म्हातारे होत आहात, आता लग्न करा! मित्रा, वाढदिवस आणि वर्ष खूप चांगले जावो." अशा शब्दात स्वराने फहादला शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे स्वराने फहादला आधी भाऊ मानलं होतं आणि आता थेट त्याच्याशीच गुपचूप लग्न केलं.

या ट्विटला उत्तर देताना फहाद म्हणाला होता, "तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, मग वेळ काढा… मला मुलगी सापडली आहे. ..." असा रिप्लाय फहादने दिला होता. एकूणच 'आधी भैया नंतर सैया' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी स्वराला दिल्या आहेत.

फहाद हे समाजवादी युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष आहे. ते महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीशी देखील जोडले गेले आहेत.

स्वरा भास्करनं मात्र तिच्या या वैवाहिक नात्याविषयी यापूर्वी कोणताही खुलासा केला नव्हता. कुणालाही काहीही सांगितलेही नव्हते. तिने गुपचूप लग्न करून सर्वांना धक्का दिलाय.

स्वरा भास्करने २०१० मध्ये गुजारिश या हिंदी फिल्म पासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे आनंद एल राय यांच्या २०११ मध्ये आलेल्या तनु वेडस् मनू सिनेमातील तिच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

स्वरा ही दिल्लीतील मिरांडा हाऊसमधून पदवीधर झालेली आहे. याशिवाय तिनं जेएनयु विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. स्वरा तिच्या वादग्रस्त पोस्ट्स मुळे आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर करत असलेल्या टीका टिप्पणीमुळे कायम चर्चेत राहिली आहे