
Swara Fahad चं बरेलीत ग्रँड रिसेप्शन! थेट पाकिस्तानातुन मागवला लेहेंगा..फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. नुकतच तिने फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. हे लग्न जरी साध्या पद्धतिने झाले असले तर दोघांनी या सोहळ्यात कसलीच कसर सोडलेली नाही.
दिल्लीत स्वरा भास्करने तिच्या आजीच्या घरी हळदी, मेहंदी आणि संगीत लग्नाचे विधी पार पाडले. त्यांनतर स्वरा-फहादने कुटुंब आणि मित्रांसाठी कव्वाली रात्री आणि भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते, या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या रिसेप्शन पार्टीत अनेक दिग्गज राजकारनांनी हजेरी लावली होती. यात राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादवपर्यंत अनेक राजकिय व्यक्ती उपस्थीत होते.

Swara Bhasker Fahad Reception
या कार्यक्रमानंतर आता फहाद अहमद यांनी बरेलीमध्ये एक भव्य दावत-ए-वलीमा दिला. हा सोहळा खुपच नवाबी झाल्याचा व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दिसत आहेत. या खास सोहळ्यासाठी स्वरासाठी खास पाकिस्तानी डिझायनरचा लेहेंगा ऑर्डर करण्यात आला होता. स्वराच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.
स्वरा-फहादने बरेलीतील 'द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट'मध्ये भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. स्वराने पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम कलरचा लेहेंगा परिधान केला होता.
या लेहेंग्यावर एम्ब्रॉयडरी वर्कसह सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. स्वराने तिच्या बेज रंगाच्या लेहेंगामधील व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे. भव्य @alixeeshantheatrestudio ची एक झलक. ज्यांनी हा लेहेंगा बनवला आहे. मला सीमेपलीकडून पाठवला आहे! हे पाठवल्याबद्दल @natrani चे खूप खूप आभार.

Swara Bhasker Fahad Reception
स्वरा भास्करने लग्नातही तिच्या पारंपारिक लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिच्या या लुकची सोशल मिडियावर बरिच चर्चा रंगली होती. देण्यासाठी तिला माथा पट्टी आणि मोठ्या नाकाच्या नथ आणि कानातले मोठे झुमके आणि सुंदर चोकर नेकलेसने तिच्या सौदर्यांत आणखीनच भर टाकली. अभिनेत्रीने तिच्या लूकला ब्रेसलेट आणि हातात अंगठी घालुन पुर्ण केले होते. स्वराने लेहेंग्यासोबत मल्टी प्रिंटेड दुपट्टा कॅरी केला होता.
तर फहाद अहमदने नवाबासारखी आलिशान शाल आणि गोल्डन कुर्त्यावर ऑफ-व्हाइट सदरी घातली होती. . स्वरा-फहादच्या लग्नाच्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे अनेक नेते पोहोचले. सपा नेते शोएब अन्सारी यांनी स्वरा फहादच्या रिसेप्शनचा फोटो शेअर केला आहे. सर्वांनीच नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.