'माझ्या सवतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..', स्वरा भास्करची पोस्ट व्हायरल..Swara Bhasker Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swara Bhasker Post

Swara Bhasker Post: 'माझ्या सवतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..', स्वरा भास्करची पोस्ट व्हायरल..

Swara Bhasker Post viral: अभिनेत्री स्वरा भास्करचे नाव अशा निवडक सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे तिच्या निर्दोष शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. स्वरा कोणत्याही मुद्द्यावर बिनधास्त मत मांडत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

त्यामुळे तिला ट्रोलही केलं जात मात्र त्याचा काही फारसा फरक तिला पडत नाही. ती नेहमीच यामुळे चर्चेत असते.

काही दिवसांपुर्वीच तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली आहे. ती बऱ्याचदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

दरम्यान स्वरा आज पुन्हा चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे तिने तिच्या नवऱ्यांच्या पहिल्या पत्नीला वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच स्वराने काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर नवीनचं चर्चा सुरु झाली आहे.

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की फवादचं पहिलं लग्न झालं आहे की काय तर तसं नसून फवादचं पहिले लग्न झालेलं नसून स्वरानं शुभेच्छा दिलेली व्यक्ती हा फवादचा खुप जवळचा मित्र आहे. ज्याला स्वरा तिची सवत मानते.

खरं तर, स्वरा भास्करने तिच्या इंस्टाग्रामवर अरिश कमरचे फवादसोबतचे काही फोटो शेअर केले आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तिने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये दिले आहे की, आमचा मित्र, कॉम्रेड आणि फहादचा खरा जोडीदार अरिश कमर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

याबरोबरच स्वराने नेहमीच तिच्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, तिची सर्व न्यायालयीन कागदपत्रे वेळेवर सादर केली जातील याची खात्री केल्याबद्दल, त्याच्यासाठी साक्षीदार झाल्याबद्दल आणि तिची आतापर्यंतची सर्वोत्तम 'सवत' असल्याबद्दल त्याचे आभार मानले आहे.

स्वराची ही पोस्ट सोशल मिडियावर कमालीची व्हायरल झाली आहे. नेटकरी तिच्या पोस्टला मजेशीर कमेंटही करत आहे.

स्वराने फेब्रुवारीमध्ये समाजवादी नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर मार्चमध्ये दिल्लीत लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये राजकारण आणि बॉलिवूडशी संबंधित अनेक सेलिब्रिटी दिसले.

फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. स्वरा भास्कर लग्नानंतर खूप ट्रोल झाली होती. लग्नानंतर स्वरा भास्करचा 'मिसेस फलानी' हा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.