स्वरा भास्कर, गोहर खान, रिचाच्या शेलक्या प्रतिक्रियांनी नेटकरी संतापले

richa chaddha, swara bhaskar, gohara khan, news, bollywood
richa chaddha, swara bhaskar, gohara khan, news, bollywood

मुंबई - बाबरी मशीद प्रकरणात बुधवारी न्यायालयाने निकाल दिला. या निकालानंतर काही वेळातच सोशल माध्यमांतुन त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. निकालावर अनेकांनी आनंद साजरा केला. तर काहींंकडुन त्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यासगळ्यात बॉलीवूडच्या कलाकारांनी उडी घेतली असून त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर तितकेच तिखट उत्तर नेटक-यांनी दिले आहे.

अयोध्येतील बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. १९९२ मध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हा निकाल देण्यात आला.  बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा देत या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह 20 जण मुख्य आरोपी होते. या सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर काही बॉलिवूड कलाकारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने “.. बाबरी मस्जिद ख़ुद ही गिर गया था। ” असं उपरोधिक ट्विट केलं आहे. गौहर खान हिने “भूकंपामुळे मशीद पडली होती का?” असा  प्रश्न उपस्थित केला आहे. काही बॉलिवूड कलाकारांच्या या शेलक्या आणि उपरोधिक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर रिचा चढ्ढा हिने '' इस जगह से ऊपर भी एक अदालत है, यहां देर है अंधेर नहीं। " असे म्हटले आहे. १९९२ साली देशव्यापी रथयात्रा काढण्यात आली होती, जिचं नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांनी केलं होतं.

या रथयात्रेनंतर अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या प्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले.

१६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना कोरोनाची   लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com