...म्हणून लॉकडाऊनमध्ये दिल्लीला पोचली अभिनेत्री स्वरा भास्कर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

स्वराने लॉकडाऊन सुरु असताना मुंबई ते दिल्ली प्रवास केला. मात्र हा प्रवास विनाकारण नव्हे तर माझ्या आईसाठी केला असल्याचं स्वराने आता स्पष्ट केलं आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे काही कलाकार मंडळी आपल्या कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवत आहेत. तर काही कलाकार आपल्या कुटुंबापासून दुर राहत आहे. दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढत असल्याने आहे त्या जागी राहण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सारी परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर येईल, अशी काही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर थेट दिल्लीमध्ये पोहचली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मुंबई ते दिल्ली स्वराने रोडने प्रवास केला आणि तो प्रवास कशासाठी याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या. मात्र आता याचं कारण स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा - मराठी चित्रपट, नाट्य व टिव्ही इंडस्ट्रीतील मंडळींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद, विविध प्रश्नांबाबत झाली सकारात्मक चर्चा

स्वराने लॉकडाऊन सुरु असताना मुंबई ते दिल्ली प्रवास केला. मात्र हा प्रवास विनाकारण नव्हे तर माझ्या आईसाठी केला असल्याचं स्वराने आता स्पष्ट केलं आहे. स्वरा मुंबईमध्ये एकटी राहत होती. तसेच तिचे आई-वडील दिल्लीमध्ये आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर झालं त्यामुळे ती तिच्या कुटुंबियांना देखील भेटू शकली नाही. मात्र मध्यंतरी तिच्या आईची तब्येत बिघडल्याने स्वराला आईला भेटणं गरजेचं होतं आणि म्हणूनच ती सरकारची अधिकृत परवानगी घेत दिल्लीला जाण्यास रवाना झाली.

Veere Di Wedding: This is what Swara Bhasker's mother has to say ...

स्वरा याबाबत म्हणते, माझ्या आईच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शिवाय फ्रॅक्चर देखील झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये आमचे जवळचे नातेवाईक आहेत ते तिचा सांभाळ करत होते. मात्र किती दिवस असं चालणार, नातेवाईक किती दिवस सांभाळ करणार हे आम्हालादेखील पटत नव्हतं. शिवाय दुखापतीमुळे आईला त्रासदेखील होत आहे. त्यामुळे मी थेट दिल्लीला येण्याचं ठरवलं. खरं तर मी दिल्ली येत आहे हे मी माझ्या आई-वडिलांना आधी कळवलंच नाही. मी अशी अचानक आलेली पाहून त्यांनादेखील समाधान वाटलं.

आता घरी राहून आईची काळजी घेता येते म्हणून स्वरा फार खूश आहे. आपल्या कुटुंबियांबरोबर राहून त्यांना देखील समाधान वाटत असल्याने काही दिवसांसाठी तरी स्वरा आता दिल्लीमध्येच राहणार आहे. स्वराने  मुंबई ते दिल्ली प्रवास दुसऱ्या कोणत्या कारणासाठी नव्हे तर आई आजारी असल्याने केला असल्याचं आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.   

swara bhasker travels mumbai to delhi in lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swara bhasker travels mumbai to delhi in lockdown