Swara Bhasker: स्वरा भास्करच्या गुपचूप लग्नानंतर आता दिल्लीत ग्रँड रिसेप्शनची तयारी, हे मोठे अपडेट आले समोर

स्वरा भास्कर सध्या तिच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे चर्चेत आहे. या खास फंक्शनचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. .
swara bhasker and fahadh ahmed
swara bhasker and fahadh ahmed Sakal

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत तिच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हळदी, मेहेंदी आणि संगीतच्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे, तर फहाद अहमद देखील तिच्यासोबत प्रत्येक फंक्शनमध्ये दिसत आहे.

आज 16 मार्च हा दिवस स्वरासाठी आणखीनच खास आहे. स्वरा आणि फहाद आज दिल्लीत ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. लग्नाच्या रिसेप्शन कार्डचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वरा भास्करचे वडील उदय भास्कर यांनी सोशल मीडियावर लग्नाच्या रिसेप्शनचे इनविटेशन पोस्ट केले आहे, ज्यामध्ये दिवस, ठिकाण आणि वेळ देखील नमूद केली आहे. हे लग्नाचे रिसेप्शन दिल्लीच्या एअर फोर्स ऑडिटोरियममध्ये आयोजित केले जाईल, ज्यामध्ये कुटुंबाव्यतिरिक्त, खास मित्र आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत.

फहाद राजकारणाशी संबंधित आहे, त्यामुळे या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये राजकारणाशी संबंधित लोकही पाहुणे म्हणून पोहोचतील अशी अपेक्षा आहे.

swara bhasker and fahadh ahmed
Salman Yusuf Khan: कोरिओग्राफर सलमान युसुफसोबत बेंगळुरू एअरपोर्टवर घडली धक्कादायक घटना, व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

2019 मध्ये प्रोटेस्ट दरम्यान स्वरा भास्कर फहाद अहमदला भेटली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते पण याबाबत कोणालाच सुगावा लागला नाही.

6 जानेवारी रोजी अभिनेत्रीने फहादसोबत कोर्ट मॅरेज केले, त्यानंतर स्वराने फोटोद्वारे खुलासा केला की तिने लग्न केले आहे. या सीक्रेट वेडिंगने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

swara bhasker
swara bhasker Sakal

दिल्लीत होणाऱ्या स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनच्या फोटोंबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. 7 वाजल्यापासून फंक्शन सुरू होतील. या फंक्शनमध्ये स्वरा कोणती काय घालणार, तिचा मेकअप कसा असेल, या सर्व गोष्टींबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

स्वराचे सासरचे घर बरेलीच्या बहेडीमध्ये आहे आणि येथेही तिच्या स्वागताची तयारी सुरू आहे. 19 मार्च रोजी बरेली येथे रिसेप्शन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com