पुण्याची स्वरदा साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी ! Swarada Thigale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swarada thigale
पुण्याची स्वरदा साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी !

पुण्याची स्वरदा साकारणार स्वराज्य सौदामिनी ताराराणी !

sakal_logo
By
अरुण सुर्वे

पुणे - सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या आगामी मालिकेच्या पहिल्या टिझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेच्या निमित्ताने स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीबद्दल प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभली आहे.

स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे.

हेही वाचा: शेरशाहनंतर 'योध्दा' चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा फर्स्ट लूक

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्‍या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे.‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून ताराराणी ह्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय देण्यासाठी स्वरदा अथक मेहनत घेते आहे. 'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराबाईंच्या लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे.

loading image
go to top