श्रेयस तळपदेची धावाधाव.. एकिकडे शूट तर दुसरीकडे पत्नीला स्वाईन फ्लू

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

संवेदनशील अभिनेता आणि अस्सल मराठमोळ्या रंगमंचावरून बाॅलिवूडमध्ये गेलेले नाव म्हणून आपण श्रेयस तळपदेकडे अभिमानाने पाहातो. आता श्रेयस दोन प्रोजेक्टवर काम करतोय. पैकी एक गोलमाल असून दुसरा पोस्टरबाॅईज हा चित्रपट आहे. या दोन्हीत तो बिझी असताना, नव्याने एक अडचण त्याच्यासमोर आली आहे, ती म्हणजे, त्याची पत्नी दिप्ती हिला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

मुंबई : संवेदनशील अभिनेता आणि अस्सल मराठमोळ्या रंगमंचावरून बाॅलिवूडमध्ये गेलेले नाव म्हणून आपण श्रेयस तळपदेकडे अभिमानाने पाहातो. आता श्रेयस दोन प्रोजेक्टवर काम करतोय. पैकी एक 'गोलमाल अगेन' असून दुसरा 'पोस्टर बाॅईज' हा चित्रपट आहे. या दोन्हीत तो बिझी असताना, नव्याने एक अडचण त्याच्यासमोर आली आहे, ती म्हणजे, त्याची पत्नी दिप्ती हिला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. 

या दोन प्रोजेक्टमध्ये बिझी असतानाच दिप्तीला ताप आला. आज सकाळी निदान केल्यानंतर तिला स्वाईन फ्लू असल्याचे निदर्शनास आले. तिला अंधेरी येथील हाॅस्पिटलमध्ये अंगळवारी दाखल करण्यात आले आहे. तिला सकाळी दवाखान्यात दाखल करून श्रेयसला परत शूटिंगसाठी परतावे लागले. 'गोलमाल'च्या कलाकारांच्या तारखा घेऊन ठेवल्याने श्रेयसला दिप्तीजवळ थांबणे शक्य नव्हते.

यावेळी बोलताना श्रेयस म्हणाला, 'खरेतर हा काळ कठीण आहे. दिप्तीला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर मला तिच्यासोबत थांबायचे होते. पण मला एका स्टुडिओतून दुसऱ्या 'गोलमाल अगेन'च्या सेटवर पोहोचायचे होते. तारखा दिल्याने काम वेळेत पूर्ण व्हायला हवे. शिवाय हिंदीत येणाऱ्या 'पोस्टर बाॅईज'च्या ट्रेलरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आता मधल्या ब्रेकवेळी मी दिप्तीकडे जाईन, त्याशिवाय पर्याय नाही.'

 

Web Title: swine flu dipti talpade esakal news