'सेरा नरसिम्हा रेड्डी' चा ट्रेलर प्रदर्शित ; काही वेळातच ट्रेंडिंगमध्ये !

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत.

मुंबई : तेलगु चित्रपट 'सेरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि साऊथस्टार चिरंजीवी एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतला चेहरा दिसतो आणि त्यानंतर 'भारत माता की जय' असे नारे सुरु होतात. यामध्ये अमिताभ नरसिम्हा रेड्डी विषयी माहिती देताना दिसत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. 

चिरंचीवी आणि अमिताभ यांच्या या चित्रपटाची चर्चा अनेक दिवस चालू होती. अखेर आज ट्रेलर प्रदर्शित झाला. चिरंजीवी यांचा हा 151 वा चित्रपट असणार आहे. तर, अमिताभ यांचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. सिनेमामध्ये रवी किशन आणि अभिनेक्षी तमन्ना भाटिया मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. अमिताभ हे गुरु गोसाई वेकन्ना तर चिरंजीवी उयाल्लवाडा नरसिम्हा रेड्डी या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये सेतुपति, जगपती बाबू, अनुष्‍का शेट्टी ही मंडळीदेखील आहेत.

हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तमिळ अशा चार भाषांमध्ये हा प्रदर्शित केला जाईल. एकुणच दिग्गज कलाकारांची कास्ट असणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे !सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sye Raa Narasimha Reddy trailer out