तापसीची लंबी लिस्ट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

"पिंक' या चित्रपटातून आपली ओळख बनवलेली अभिनेत्री तापसी पन्नूला जरा हटकेच मुलं आवडतात. तिने तिच्या"िरनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या कार्यक्रमात तिला कोणता हिरो आवडायचा, या प्रश्‍नावर हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम असं सांगितलं. हृतिक आणि जॉन तिला खूप ऍट्रॅक्‍टिव वाटतात, असं तिने सांगितलं. तिची ही लिस्ट बॉलीवूडपर्यंतच मर्यादित नाहीये बरं का! ती पार हॉलीवूडचा अभिनेता सॅम क्‍लाफिन याच्यापर्यंत जाऊन पोहोचते. तिला कशा प्रकारची मुलं आवडतात, हे विचारल्यावर ती म्हणाली, "आजकालच्या काळात प्रामाणिक आणि इमानदार मुलगा मिळाला तरी खूप आहे. जो आपल्या टॅलेंटवर आयुष्यात काहीतरी करत असेल आणि स्वाभिमानी असेल.

"पिंक' या चित्रपटातून आपली ओळख बनवलेली अभिनेत्री तापसी पन्नूला जरा हटकेच मुलं आवडतात. तिने तिच्या"िरनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या कार्यक्रमात तिला कोणता हिरो आवडायचा, या प्रश्‍नावर हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम असं सांगितलं. हृतिक आणि जॉन तिला खूप ऍट्रॅक्‍टिव वाटतात, असं तिने सांगितलं. तिची ही लिस्ट बॉलीवूडपर्यंतच मर्यादित नाहीये बरं का! ती पार हॉलीवूडचा अभिनेता सॅम क्‍लाफिन याच्यापर्यंत जाऊन पोहोचते. तिला कशा प्रकारची मुलं आवडतात, हे विचारल्यावर ती म्हणाली, "आजकालच्या काळात प्रामाणिक आणि इमानदार मुलगा मिळाला तरी खूप आहे. जो आपल्या टॅलेंटवर आयुष्यात काहीतरी करत असेल आणि स्वाभिमानी असेल. नाही तर बाकी जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा मी लिस्ट पाठवेन.' म्हणजे तिच्या आपल्या आवडत्या बॉलीवूड स्टारपासून ते लग्नासाठी योग्य वराच्या अटींपर्यंत सगळ्या लिस्ट तयार आहेत म्हणायच्या! 
 

Web Title: taapsee pannu lambi list for wedding