'या' महिला क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार तापसी, पाहा 'शाबाश मिथु'चं पोस्टर

वृत्तसंस्था
Wednesday, 29 January 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येतोय. 'शाबाश मिथु' असं सिनेमाचं नाव आहे. यामध्ये मितालीच्या भूमिकेत अभिनेत्री तापसी पन्नू  झळकणार आहे.

मुंबई : नवीन वर्षासह वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वर्षाची सुरुवात ही ब्लॉकबस्टर चित्रपटांनी झाली. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड वाढतो आहे. क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंवर बायोपिक आले. आताही  ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सायना’, ‘सरदार उधम सिंग’, ‘मिसाईल मॅन’ असे जबरदस्त बायोपिक मोठया पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. त्यातच भर पडली आहे आणखी एका इंटरेस्टिंग बायोपिकची. जाणून घ्या हा सिनेमा कोणावर तयार होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When she said she wants her mark on it and she did it! #TP #MyBatMobile #HouseOnWheels

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित आहे. 'शाबाश मिथु' असं सिनेमाचं नाव आहे. यामध्ये मितालीच्या भूमिकेत अभिनेत्री तापसी पन्नू  झळकणार आहे. मितालीच्या स्टाईलमधेच हुबेहूब दिसतानाचा पोस्टर तापसिने तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

तापसीचा एक वेगळा आणि जबरदस्त लुक समोर आला आहे. पोस्टर रिलिज झाल्यावर काही तासातच तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. हा पोस्टर शेअर करताना तापसीने एक खास पोस्टही लिहिली आहे. कॅप्शनमध्ये तिने म्हणटलं आहे, '' मला नेहमी विचारले जाते की तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोणता ? पण, त्याऐवजी आवडती महिला क्रिकेटर कोण असं विचारलं पाहिजे. मिताली राज माझी आवडती क्रिकेटर आहे. ती अल्टीमेट गेम चेंजर आहे''.

तापसी नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते. आजवर तिने केलेल्या चित्रपटांतून चौकटीबाहेरच्या भूमिका तिने केल्या आहेत. 'सूरमा' या चित्रपटातून तिने हॉकी खेळाडूची भूमिका केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

She was chaos and beauty intertwined. A tornado of roses from divine. Shakieb Orgunwall @avigowariker

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

'शाबाश मिथु' या सिनेमाचं दिग्दर्शन राहूल ढोलकिया करणार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीचे 2019 मध्ये मिशन मंगल, बदला आणि सांड की ऑंख हे चित्रपट सुपरहिट झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taapsee Pannu reveals first look of Mithali Raj biopic Shabaash Mithu