esakal | ‘तारक मेहता’ मालिकेतील रिटाला कोरोना; इन्स्टाग्रामवरुन दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, Actor, Priya Ahuja, Positive for Covid 19

मालिकांचे चित्रिकरण सुरु करण्यास परवानगी द्या अशी मागणी कलाकारांकडून करण्यात आली होती. कुठला एखादा कलाकार कोरोनाग्रस्त असल्यास त्याचा परिणाम मालिकेच्या चित्रिकरणावर होत असल्याचे दिसुन आले आहे.  गेल्या अनेक वर्षांपासुन लहान मोठ्यांपासुन सर्वांच्या आवडीची असलेली सब टीव्हीवरील  लोकप्रिय मालिका म्हणुन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’चे नाव घ्यावे लागेल. 

‘तारक मेहता’ मालिकेतील रिटाला कोरोना; इन्स्टाग्रामवरुन दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाचे भय संपता संपत नाही. या भयानक आजाराने आतापर्यत अनेकांचे जीव घेतले आहेत. यात बॉलीवूड मधल्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासुन कोरोनामुळे दैनंदिन आयुष्य थांबले असताना त्यामुळे दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. थोडफार जीवनमान रुळावर येण्याचा अवकाश त्यात पुन्हा नवे संकट उभे राहत आहे. मालिकांचे चित्रिकरण सुरु करण्यास परवानगी द्या अशी मागणी कलाकारांकडून करण्यात आली होती. कुठला एखादा कलाकार कोरोनाग्रस्त असल्यास त्याचा परिणाम मालिकेच्या चित्रिकरणावर होत असल्याचे दिसुन आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन लहान मोठ्यांपासुन सर्वांच्या आवडीची असलेली सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका म्हणुन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’चे नाव घ्यावे लागेल. आता मालिकेतील एका अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा राजदा असे त्या कोरोनाची लागण झालेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. प्रियाने इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे हे तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.डॉक्टरांनी सांगितलेली मी सर्व काळजी घेत आहे. तसेच सध्या होम क्वारंटाइन आहे. स्वत:ची काळजी घ्या आणि घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरु नका’ असे तिने सांगितले आहे.  

प्रियाची ही पोस्ट पाहता मालिकेतील जेठालाला (दिलीप जोशी), गोगी समय शाह, सोनू झील मेहता यांनी ती लवकरात बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. तू लवकरच बरी होशील, काळजी घे असे म्हणत त्यांनी प्रियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. प्रियाने गुजराती दिग्दर्शक मालव राजदा याच्यासोबत लग्न केलं आहे. मालव राजदा हे ‘तारक मेहता उल्टा चष्मा’चे चीफ डायरेक्टर आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर प्रिया आणि मालवची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.