'तारक मेहता..' फेम दयाबेनच्या घरी चिमुकल्या पाऊलांचे आगमन

​​'तारक मेहता..' फेम दिशा वकानी दुसऱ्यांदा आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.
Disha Vakani
Disha Vakaniesakal

तारक मेहता उल्टा चश्मा हा शो खुप लोकप्रिय आहे. या शोच्या चाहत्यांना दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने गुड न्युज दिली आहे. ​​दिशा वकानी (Disha Vakani) दुसऱ्यांदा आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. ही माहिती एका मुलाखती दरम्यान समोर आली.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दिशाचा म्हणजेच शो मधील सुंदरलाल याने याबद्दल माहिती दिली. दिशाचा भाऊ हा देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारताना दिसतो. यावेळी तो म्हणाला की, मी पुन्हा एकदा मामा झालो आहे. 2017 मध्ये दिशाला मुलगी झाली होती. आता पुन्हा दिशानं एका मुलाला जन्म दिला आहे. ती पुन्हा एकदा आई झाली आहे. मी यासाठी खूप आनंदी असल्याचे देखील तो यावेळी म्हणाला.

Disha Vakani
'तारक मेहता' मधून आता हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत

तसेच दिशाचा पती यानेदेखील याबद्दल भाष्य केलं. सध्या तर दिशा तिच्या मुलाची काळजी घेण्याता गुंग आहे. लवकरच ती यावर सगळ्यांशी बोलेल. मागच्या पाच वर्षापासून ती सगळ्यापासून लांब आहे. असे तो यावेळी म्हणाला.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मध्ये दिशाने साकारलेली दयाबेनच्या भुमिकेने सर्वांना वेड लावलं होते. त्या पात्रामुळे दिशाने सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलतं.

Disha Vakani
'तारक मेहता..'च्या 'बबिता'चं मानधन माहितीये का?

बेबी बंपसह दिशाचा व्हायरल झाला होता फोटो

दिशा वकानीचा तिचा पती मयूर सोबत फॅमिली फंक्शनमधील एक फोटो डिसेंबर २०२१ मध्ये व्हायरल झाला होता. या फोटो वकानी बेबी बंपसह दिसली. त्यावेळी तिचा तो फोटो चांगलाच चर्चेत आला होता. ती पुन्हा आई होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, तिनं यासंदर्भात कोणताही खुलासा केलेल नव्हता. त्यामुळे या चर्चेला त्याचवेळी पुर्णविराम लागला होता.

शोमध्ये पुन्हा परतणार दयाबेन

मालिकेत दयाबेनची (Daya Ben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) जवळपास पाच वर्षांपूर्वी प्रसूती रजेवर गेली होती. मात्र पुन्हा ती मालिकेत परतलीच नाही. निर्मात्यांनी अनेकदा तिला मालिकेत परत येण्याविषयी विचारणा केली होती. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ती आली नाही.

पण आता मालिकेत दयाबेनची भूमिका परत येणार असल्याचं कळतंय. खुद्द निर्माते असित कुमार मोदी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com