Dilip Joshi: मुंबई मेट्रोची सफर करून जेठालाल खुश हुआ! चाहते म्हणाले, आता बबिताजींना.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taarak mehta ka ooltah chashmah fame jethalal actor dilip joshi takes mumbai metro ride fans comments

Dilip Joshi: मुंबई मेट्रोची सफर करून जेठालाल खुश हुआ! चाहते म्हणाले, आता बबिताजींना..

Dilip Joshi: गेली १४ वर्षे निखळ मनोरंजन करणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल'.

हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे भरीव योगदान आहे. पण तारक मेहता मालिकेतून ते घराघरात पोहोचले.

नुकतेच त्यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून मुंबई मेट्रोला भेट दिली. या प्रवासात जेठालाल यांना इतका आनंद झाला की त्यांनी व्हिडिओ आणि पोस्ट शेयर केली आहे.

(taarak mehta ka ooltah chashmah fame jethalal actor dilip joshi takes mumbai metro ride fans comments)

दिलीप जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतंच दिलीप जोशी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रोची सफर चित्रित केली आहे. ही सफर करताना आपली ओळख लपवण्यासाठी ते मास्क लावून गेले होते. ही सफर करून त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी बहुत खुब.. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मेट्रो प्रवासानंतर जोशी यांनी एक पोस्ट लिहिली आहे की, "आज मुंबई मेट्रो जॉयराईडसाठी गेलो होतो, आणि मी एवढेच म्हणू शकतो की… बहुत खूब! ज्यांनी हे घडवून आणले त्या प्रत्येकाचे अभिनंदन आणि ज्यांच्या जीवनावर या सेवेचा सकारात्मक परिणाम झाला आहे त्या प्रत्येकाचे अभिनंदन!'

दिलीप जोशी यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने 'आता गडा इलेक्ट्रॉनिक्स ला मेट्रोने जा... ऑटोची झंझट संपली एकदाची' तर दुसर्‍याने 'तुम्ही बबिताजीला सोबत घ्यायला हवे होते, त्यामुळे तिला आनंद झाला असता' अशा कमेंट केल्या आहेत.