'Taarak Mehta..' च्या रोशन सोढीनं लैंगिक शोषण प्रकरणात शेअर केला व्हिडीओ.. निर्मात्याला आव्हान देत म्हणाली.. jennifer mistry bansiwala | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taarak Mehta Ka ooltah chashmah jennifer mistry bansiwala shares video

'Taarak Mehta..' च्या रोशन सोढीनं लैंगिक शोषण प्रकरणात शेअर केला व्हिडीओ.. निर्मात्याला आव्हान देत म्हणाली..

Taarak Mehta Ka ooltah chashmah मालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रोशन सीढी ही व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांचे मनोंरजन करणारी अभिनेत्री जेनिफर मेस्त्री बंसीवालनं नुकताच मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. मालिका सोडल्याचं सांगत अभिनेत्रीनं स्पष्ट केलं की अनेक गोष्टींना ती सहन करत आली,त्याकडे तिनं दुर्लक्ष केलं कारण तिला आपलं काम प्रामाणिकपणे करायचं होतं.

अभिनेत्रीनं लावलेल्या आरोपांना खोटं ठरवत तारक मेहताचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणाले आहेत की अभिनेत्री तिला मालिकेत परत घेण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल करत होती.

आता रोशन सोढी उर्फ जेनिफर मेस्त्री बंसीवालनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे,ज्यात तिनं स्पष्ट म्हटलं आहे की सत्य लवकरच जगासमोर येईल.(Taarak Mehta Ka ooltah chashmah jennifer mistry bansiwala shares video)

तारक मेहताच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर जेनिफरनं नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर लैंगिक शोषण प्रकरणात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिनं आपल्या आरोपांना खोटं ठरवणाऱ्यांना कवितेच्या माध्यमातून कडक उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ''मी शांत बसलीय याला माझी कमजोरी समजू नका,मी गप्प होते,कारण मला उगाचच माझ्या कामाची प्रतारणा करायची नव्हती. देव सगळं जाणतो,त्याला माहितीय खरं काय आहे ते, त्याच्या दरबारात तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही''.

रोशन सोढीनं व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,''सत्य लवकरच समोर येईल.न्याय मिळेल''. सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्रीची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'न्यायासाठी लढ..मागे हटू नकोस'.

माहितीसाठी सांगतो की रोशन सोढी ही व्यक्तिरेखा साकारणारी जेनिफर मेस्त्री बंसीवाल हिच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाला खोटं ठरवत सोहिल रमानीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की,''प्रॉडक्शन हाऊसनं जेनिफरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं,तीन महिने आधीच तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तिला कुठेच काम मिळत नाही म्हणून तिला आता तारक मेहता.. मालिकेत परत यायचं आहे..म्हणून ती असं सगळं करतेय..हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे''.