'हे लोक पैसे देत नाहीतच शिवाय..', लैंगिक शोषणाच्या आरोपा दरम्यान जेनिफरचा निर्मात्यांवर पुन्हा हल्लाबोल Taarak Mehta ka Ooltah Chashmah Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taarak Mehta Ka ooltah Chashmah jennifer mistry tv actress

Taarak Mehta:'हे लोक पैसे देत नाहीतच शिवाय..', लैंगिक शोषणाच्या आरोपा दरम्यान जेनिफरचा निर्मात्यांवर पुन्हा हल्लाबोल

Taarak Mehta Ka Ooltach Chashmah मालिकेत रोशन भाभी ही व्यक्तिरेखा सादर करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालानं काही दिवसांपूर्वीच निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. अभिनेत्रीनं तब्बल १५ वर्षानंतर मालिकेचा निरोप घेतलाय. ती या मालिकेशी सुरुवातीपासूनच जोडलेली होती आणि तिनं आता असित मोदीवर खूप गंभीर आरोप केले आहेत.

जेनिफरनं फक्त असित मोदी यांच्यावरच नाही तर मालिकेचे ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांना देखील वादात ओढलं आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार या तिघांमुळे अर्ध्याहून अधिक मालिकेतील कलाकार त्रासले आहेत. (Taarak Mehta Ka ooltah Chashmah jennifer mistry tv actress new claims..producer tortured everybody on set )

तारक मेहता मालिकेचे ऑपरेशन हेड सोहेल रमानीविषयी बातचीत करताना जेनिफर म्हणाली की,'' पेमेंटला पाच दिवस उशीर झाल्यानंतर जेव्हा तिनं सोहेलला कॉल केला आणि पेमेंटविषयी विचारलं तेव्हा सांगितलं गेलं की,तुम्ही कॉल केलाय तर पेमेंट २ ते ३ तासात होईल''.

जेव्हा जेनिफरनं विचारलं की, तिचं पेमेंट का थांबवलं होतं तेव्हा उत्तर मिळालं की निर्मात्यांशी या भाषेत बोलायचं नाही. निर्माता नेहमी मोठा असतो आणि कलाकार कायम छोटा असतो.

याव्यतिरिक्त जेनिफर मिस्त्रीनं सांगितलं की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर कलाकारांना मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला जातो. तिनं सांगितलं की तिला पासपोर्ट संबंधित कामानिमित्तानं बाहेर जायचं होतं. तिनं यासाठी ३ तासाची कामातून सवलत मागितली होती. पण विनंती करुनही कोणी नीट आपल्याशी बोललं नाही आणि वरनं तिचं अर्ध्या दिवसाचं मानधन कापलं.

मालिकेचे कार्यकारी निर्माते जतिन बजाज विषयी देखील जेनिफर बोलली की ते कधीच नीट बोलत नाहीत. जेनिफरच्या मते मालिकेतील इतर कलाकारांशी देखील ते तसेच वागतात.

तारक मेहता मालिकेविषयी बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांमध्ये या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. अभिनेते आणि कवी शैलेश लोढा मालिकेत गेली १५ वर्ष काम करत होते पण त्यांनीही मानधनासंबंधित निर्मात्यांशी वाद झाल्यामुळे शो सोडला होता. याव्यतिरिक्त रोशन सिंग सोढी सोबतच अंजली मेहता ही भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहतानं देखील निर्मात्यांशी वाद झाला म्हणून मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.