
Dilip Joshi On Dayaben: 'दया आय मिस यू', व्हॅलेंटाईन डे निमित्तानं जेठालालनं व्यक्त केली भावना..
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कॉमेडी शो टिव्हिवरील सर्वात लोकप्रिय शा आहे. सर्व वयोगटात यां शोचे चाहते आहेत. घराघरात या शोची क्रेझ इतकी आहे की, त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र आता हा शो पुर्वी सारखा राहिला नसल्याचंही चाहत्यांच म्हणणं आहे. याला कारण आहे म्हणजे या शोमधील लोकप्रिय कलाकारांनी हा शो सोडला.
बऱ्याच काळापासून या शोमधून स्टार कास्टच्या बाहेर पडल्यामुळे चर्चेत आहे. रोज कुठला ना कुठला जुना कलाकार शोमधून बाहेर पडतोय. कुणी नवा चेहरा शोमध्ये येत आहे. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांना अनेकदा शोमधील जुन्या कलाकारांची आठवण होते. त्यापैकी, जर सर्वात जास्त चाहते कुणाला मिस करतात तर ती आहे दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी. तिला या शोचा प्रसिद्ध चेहरा मानला जायचा.
मात्र या शोचे चाहतेचं नाही तर जेठालालही त्याच्या बायकोला म्हणजेच दयाबेन या पात्राला मिस करत आहेत. याबद्दल खुद्द दिलीप जोशी यांनी सांगितलं आहे.
खरं तर, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नव्या टप्पूच्या एन्ट्रीमुळे यावेळी संपूर्ण सेटवर आनंदाचं वातावरण आहे. अभिनेते नितीश भलुनी यांनी राज अनादुतची जागा घेतली आहे. अशा परिस्थितीत दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांनी आपला मुलगा टप्पू याला सगळ्यासमोर ओळख करुन देत आहेत. अलीकडेच कार्यक्रमात टप्पूच्या ग्रँड एन्ट्रीनंतर दिलीप जोशी यांनी नितीश भलुनी यांची मीडियाशी ओळख करून दिली. आलिकडेच टप्पूचं ग्रँड एन्ट्रीसाठी कार्यक्रम झाला.
दिलीप जोशी आणि नितीश यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पत्रकारांनी दिलीप यांना दयाबेनबाबत प्रश्न केला. ती शोमध्ये परत कधी येणार असं विचारल्यावर त्यानं सांगितलं की, 'हे निर्मात्यांवर अवलंबून आहे. ते ठरवतील की त्यांना नवीन कोणाची जागा भरायची आहे की नाही.'
एक कलाकार म्हणून मला दया ही व्यक्तिरेखा आठवते. तुम्ही सर्वांनी खूप दिवसांपासून दया आणि जेठाच्या मजेदार सीन्सचा आनंद घेतला आहे. दिशा शो सोडून गेल्यापासून तो भाग, तो अॅगल , गमतीशीर भाग गायब झाला आहे. दया आणि जेठा यांच्यातील केमिस्ट्री गायब आहे. लोकही तेच म्हणत आहेत. पहा, मी नेहमीच सकारात्मक असतो. असित भाई नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल माहीत नाही. भविष्य कोणी पाहिलंय.'