'Taarak Mehta..' च्या सोनूची आर्थिक तंगी, २००० रुपये वाचवायला बदललं होतं घर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सोनूची भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री पलक सिंधवानीचा चाहता वर्ग मोठा आहे.
Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisis
Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisisInstagram

('Tarak Mehta Ka Ooltah Chashmah') 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. या शो ने फक्त लोकांतं मनोरंजन केलं नाही तर कितीतरी कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी उपलब्ध करुन दिली. अशाच काही कलाकारांमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सोनू उर्फ पलक सिंधवानी(Palak Sindhwani) हिचं नाव देखील घेता येईल. आज भले लोकांसाठी पलक एक ओळखीचं नाव आहे, पण एक तो काळ होता जेव्हा पलकला पैशासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं होतं.(Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisis)

Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisis
Nayanthara चा लग्नसोहळा लवकरच नेटफ्लिक्सवर, ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा

बाहेरुन कलाकारांचे जग जेवढं चमकदार वाटतं,तेवढं आतून ते मूळीच नसतं. तारक मेहता फेम पलक सिंधवानीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास देखील सोपा नव्हता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा भाग बनण्याआधी पलकला पैशासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. इतकंच नाही तर आर्थिक संकटामुळे अनेकदा तिला आपलं भाड्याचं घरही बदलावं लागलं आहे. कारण तसं करुन किमान २००० रुपये तरी आपले वाचतील असा विचार ती तेव्हा करायची.

Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisis
साऊथच्या गायिकेवर भडकले लोक, देवाच्या कीर्तनाचं केलं रोमॅंटिक व्हर्जन

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पलक सिंधवानीने आपल्या स्ट्रगलवर खूप मोकळेपणाने भाष्य केले आहे. पलक म्हणाली आहे की,''मुंबईत सुरुवातीच्या काळात मला पैशासाठी खूप झगडावं लागलं. लॉकडाऊनच्या काळात मी स्वतःचे युट्युब चॅनल खोलणार होती,पण ते शक्य झालं नाही. कारण ज्या घरात मी राहत होते ते फारसे चांगल्या कंडीशनमध्ये नव्हते''.

Taarak Mehta's Palak Sindhwani on facing financial crisis
कसं करणार आलिया-रणबीर बाळाचं वेलकम? अभिनेत्याने पूर्ण लिस्टच वाचून दाखवली

आपल्या अभिनय करिअरविषयी बोलताना पलक सिंधवानी म्हणाली,''पहिल्यांदा मी जाहिरातीत काम करायला सुरुवात केली. पण ती गोष्ट माझ्या वडीलांना माहित नव्हती. एका फ्रेंडच्या माध्यमातून वडीलांना पलकच्या अभिनयातील कामाविषयी माहिती झाली. तेव्हा त्यांनी पलकला विरोध केला. पण पलकच्या आईने वडीलांना समजावलं,त्यानंतर तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. पलकला जेव्हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची ऑफर मिळाली तेव्हा तो प्रोजेक्ट साइन करण्यासाठी ती वडीलांसोबत गेली होती. पण तोपर्यंत पलकच्या वडीलांना माहित नव्हते की पलकला मालिकेत सोनूची भूमिका ऑफर झाली आहे. पण ते जेव्हा कळलं तेव्हा तिच्या वडीलांना खूप आनंद झाला होता. पलकचे वडील तिचं काम चांगलं झालं की तिची प्रशंसा देखील करतात आणि चांगलं नाही झालं तर समिक्षक बनून तिच्या चुकाही काढतात''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com