A Suitable Boy : 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत तब्बू करतेय रोमान्स!

टीम ई-सकाळ
बुधवार, 4 डिसेंबर 2019

या वेब सीरिजमध्ये तब्बू देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे, तर ईशान एका कॉलेज गोईंग स्टुडंटची भूमिका साकारत आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपला मोर्चा मोठ्या पडद्यावरून वेब सीरिजकडे वळविला आहे. त्यामध्ये आता अभिनेत्री तब्बूची भर पडली आहे. मोजक्याच चित्रपटांमधून झळकलेली आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून तब्बू ओळखली जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लवकरच तब्बू 'अ सुटेबल बॉय' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बू आता आपल्यापेक्षा 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कुणी नसून ईशान खट्टर आहे. ईशानने 'सैराट' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' मध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

First look #ASuitableBoy @bbcone #MiraNair

A post shared by Tabu (@tabutiful) on

- पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

तब्बूनेच 'अ सुटेबल बॉय' या आपल्या आगामी वेब सीरिजचा फर्स्ट लूक सोशल मीडिया साईट्सवर अपलोड केला. या वेब सीरिजमध्ये तब्बू देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे, तर ईशान एका कॉलेज गोईंग स्टुडंटची भूमिका साकारत आहे. एका श्रीमंत घरातील मुलगा एका वेश्येच्या प्रेमात पडतो आणि पुढे काय घडते? अशी या वेब सीरिजची कथा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

New beginnings. @bbcone,Mira Nair,Vikram Seth,Andrew Davies. #ASuitableBoy

A post shared by Tabu (@tabutiful) on

- Photos : या अभिनेत्रीला ओळखलंत का? तिला पाहून नेटकरीही गोंधळले

पोस्टर रिलिज झाल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ईशानची मेव्हणी आणि शाहिद कपूरची बायको मीरा राजपूत, यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्यमान खुराना, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी तब्बू-ईशान या जोडीचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

..and a new journey commences  powerhouses!

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

- 'पानिपत'च्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

मीरा नायर यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. या अगोदर तब्बूने मीरा नायर यांच्या 'द नेमसेक' (2006) या चित्रपटात काम केले आहे. तर ईशान पहिल्यांदाच नायर यांच्यासोबत काम करत आहे. या वेब सीरिजमध्ये रसिका दुग्गल, सविता कपूर, शेफाली शाह, रणदीप हुड्डा, राम कपूर, शहाना गोस्वामी हे अभिनेते-अभिनेत्री वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. पुढील वर्षी जून महिन्यात ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tabu and Ishaan Khatter featuring web series A Suitable boy first look released today