तैमुर अली खानने वयाच्या चौथ्या वर्षी बनवला हातावर टॅटू, व्हिडिओ व्हायरल

TAIMUR
TAIMUR

मुंबई- करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमुर अली खानने नुकताच २० डिसेंबर रोजी त्याच्या चौथा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. करिना आणि सैफने मोठ्या उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला. तैमुरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे या खास दिवसाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. आता त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो त्याच्या बाबांसारखा त्याचा एक शौक पूर्ण करताना दिसतोय. लहानग्या तैमुरचा हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये तो त्याच्या हातावर टॅटू बनवताना दिसून येतोय.

या व्हिडिओमध्ये तैमुर अली खान सफेद रंगाच्या टीशर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स या आऊटफिटमध्ये दिसतोयच. विशेष म्हणजे तो अगदी शांतपणे हा टॅटू त्याच्या हातावर बनवून घेतोय. या टॅटूबद्दल सांगायचं झालं तर हा तात्पुरता टॅटू आहे. तैमुरचा हा व्हिडिओ त्याच्या फॅमपेजवरुन शेअर केला गेला आहे जो खूप व्हायरल होतोय. नेहमीप्रमाणेच तैमुर या व्हिडिओमध्ये क्युट दिसतोय. तसंच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये हॅप्पी बर्थ डे गाणं सुरु आहे.

२० डिसेंबर रोजी तैमुर ४ वर्षांचा झाला. या खास दिवशी कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. तैमुरच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये रणधीर कपूर, बबीता, करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू आणि त्याची मुलगी इनाया यांनी हजेरी लावली होती. तैमुर बॉलीवूडच्या सगळ्याच प्रसिद्ध स्टारकिडपैकी एक आहे. करिनाने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ देखील तैमुरच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला.   

taimur ali khan made tattooed on his arm at age of 4 year video viral  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com