'सैफच्या पोराची उडवली टर, मोक्कार हशा'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर मात्र ट्रोल होऊ लागला आहे. 

मुंबई - केवळ भारतातल्या नाही तर जगातल्या कित्येक सेलिब्रेटींचं लक्ष अनुष्काच्या बाळंतपणाकडे होतं. अनुष्का शेवटच्या महिन्यापर्यत सोशल मीडियावर सक्रिय होती. शीर्षासन, प्राणायम करणे, वेगवेगळ्या पध्दतीचे डाएट करणे यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानिमित्तानं तिला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. त्या दरम्यान तर ती अधिक वाढली होती. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे सारं करत होतो असे तिनं सांगितलं होतं.

मंगळवारी अखेर ती गोड बातमी देशात सोशल मीडियाच्या आधारे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अनुष्काचा पती विराट कोहलीनं दिली. त्यानंतर त्या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Image

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर मात्र ट्रोल होऊ लागला आहे. त्यावरुन मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले होते. ते अजूनही होत आहेत. यावरुन सोशल मीडियामध्ये चांगलीच खसखस पिकली आहे.

Image

सध्या तैमूर खान सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. जशी अनुष्काला मुलगी झाली तसं तैमूरवरुन मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

Image

अनेकांनी चित्रपटातील, मालिकांमधील संवाद, गाणी, जाहिराती, याचा आधार घेऊन मीम्स तयार करण्यात आले आहेत.

Image

गेल्या काही दिवसांपूर्वी तैमूरच्या आजीनं म्हणजे शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीमध्ये अनुष्काचं बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा परिणाम तैमूरच्या प्रसिध्दीवर होणार असल्याचे सांगितले होते.

Image

विराटनं आपल्याला मुलगी झाल्याचे सांगताच त्य़ाला लाखोंच्या संख्येनं लाईक्स, कमेंटस मिळाल्या आहेत. यावरुन त्याच्या मुलीला मिळणारी प्रसिध्दी आणि त्याचे स्वरुप लक्षात येईल.

Image

विराटनं खास  अनुष्का आणि बाळासाठी सुट्टी घेतली होती. विराटने सांगितलं होतं की त्याला जेव्हा त्याच्या बाळाचं या जगात आगमन होईल तेव्हा आपल्याला बाळ आणि अनुष्कासोबत हजर राहायचं आहे.

After Anushka Sharma became mother now people start sharing funny memes on taimur ali khan

विराटने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी सोशल मिडिया ट्विटवर शेअर केली आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलंच अपत्य आहे. दोघांनी सोशल मिडियावरुन गुड न्युज शेअर केल्यापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होती.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taimur Ali Khan starts trending on social media after Anushka Virat first baby