esakal | कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर; शिल्पा शेट्टीची बाप्पाचरणी प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर; शिल्पा शेट्टीची बाप्पाचरणी प्रार्थना

आता आपल्यावर कोरोना महामारीचे जे संकट आले आहे ते लवकरात लवकर दूर व्हावे. सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाला करणार आहे, असे उद्गार अभिनेत्री शिल्पा शेट्टीने काढले.

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर; शिल्पा शेट्टीची बाप्पाचरणी प्रार्थना

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई ः आता आपल्यावर कोरोना महामारीचे जे संकट आले आहे ते लवकरात लवकर दूर व्हावे. सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाला करणार आहे, असे उद्गार अभिनेत्री शिल्पा शेट्टीने काढले.

65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी; मंत्री अमित देशमुख यांची माहिती 

शिल्पा शेट्टी जुहू येथे राहते आणि तिच्या घरी दरवर्षी दीड दिवस बाप्पांचा मुक्काम असतो. यंदाचे हे अकरावे वर्ष आहे. दरवर्षी ती लालबागचा राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्याकडून मूर्ती घेऊन जाते. दरवर्षी ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येते आणि गणेशमूर्ती घेऊन जाते. परंतु आज ती दोन दिवस आधीच आली आणि गणरायाची मूर्ती घेऊन गेली. या वेळी ती म्हणाली, की यावर्षी गणेशोत्सव मी साध्या पद्धतीने साजरा करणार असले तरी माझ्यातील भक्ती किंवा भावना तीच आहे. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने आम्ही गणेशाची सेवा करतो.

सेलिब्रेटी बाप्पा! सरकारने घालून दिलेले नियम, तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठीच - गौरी नलावडे 

सध्या आपल्यावर संकट आहे कोरोनाचे. बाप्पा आता ते लवकरच दूर करील. मी बाप्पाकडे प्रार्थना करते.  यावर्षी मी धामधुमीत नाही तर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहे. सगळ्यांना माझे हेच आवाहन आहे की यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा व आपले आरोग्य उत्तम ठेवा, असेही शिल्पा म्हणाली. मूर्तिकार संतोष कांबळी म्हणाला, की दरवर्षी शिल्पा शेट्टी माझ्याकडून दोन फुटांची मूर्ती नेते. यावर्षीही दोन फुटांचीच मूर्ती आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर दोनेक महिने ती आम्हाला ऑर्डर देते. आज ती सकाळी आली आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळून मूर्ती नेली आहे. 

--------------------------------------------------------

loading image
go to top