
टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये प्रसिध्द असणारी अभिनेत्री चित्रा शुटिंग संपवून हॉटेलमध्ये आली होती. दुस-या दिवशी ती मृतवस्थेत असल्याचे दिसून आले.
मुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री चित्राची एका हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याची घटनेची वार्ता सगळीकडे वा-यासारखी पसरली. यानंतर तिच्या मृत्युचे नेमकं कारण काय याविषयी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता वेगळा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चित्राची आत्महत्या यामागील नेमकं कारण हे शोधण्यात पोलीस गुंतले आहेत.
टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये प्रसिध्द असणारी अभिनेत्री चित्रा शुटिंग संपवून हॉटेलमध्ये आली होती. दुस-या दिवशी ती तिच्या खोलीत मृतवस्थेत असल्याचे दिसून आले. आता त्यावरुन वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. चित्रानं दिलेल्या एका इंटिमेट सीनवरुन तिचे आणि पतीचे वाद झाले होते. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे चित्राच्या आईनं चित्राच्या पतीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. 29 वर्षीय चित्रा ही तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीची अभिनेत्री होती. पँडेयिन स्टोअर्समध्ये तिनं केलेली मुल्लाई नावाची व्यक्तिरेखा ही विशेष गाजली होती. नजरेपट्टेईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिनं आत्महत्या केल्याचे दिसून आली आहे. तिच्या जाण्यानं तमिळ टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
चित्रा पहाटे शुटिंग संपवून हॉटेलमध्ये आली, दुसरा दिवस तिनं पाहिला नाही
चित्रा शुटींग संपवून पहाटे अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये आली होती. त्यावेळी ती तिचा होणारा पती हेमंत बरोबर होती. काही महिन्यांपूर्वी तिचा साखरपूडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. तमिळ मधल्या वेगवेगळ्या टीव्ही मालिकांवर तिनं काम केलं होतं. चित्रानं केलेली आत्महत्या ही एका तिच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे पोलिसांचे म्हणणे आहे. चित्राच्या पतीनं दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, चित्रा आणि तिचा पती हेमंत हे एकाच हॉटेलमध्ये राहत होते. आपण ज्यावेळी तिला मदत करण्यासाठी गेलो तेव्हा ती मृत झाली होती.
'आर्याच्या पोटात दोन लीटर दारु; त्यामुळे आला अॅटॅक '
तपास करणा-या पोलीस अधिका-यांनी असे सांगितले की, चित्रानं एका मालिकेत दिलेल्या इंटिमेट दृश्यामुळे तिच्या पतीला राग आला होता. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. ज्यावेळी चित्रा आपलं शुटिंग संपवून हॉटेलमध्ये आली होती तेव्हा तिनं आपण फ्रेश पतीला रुमबाहेर थांबण्यास सांगितले होते. असे तिच्या पतीच्या जबाबात म्हटले आहे. आपण बराच वेळ दार वाजवत होतो मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पहाटे 3.30 वाजता याविषयी हॉटेलमधल्या एकाला आणि पोलिसांना कल्पना दिली. असे पती हेमंतने सांगितले.