#2MLikesForBigilTrailer थालापथी विजयची सोशल मीडियावर हवा! ट्रेलरला 2 मिलियन व्ह्यूज

टीम ईसकाळ
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

चार दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या बिगिल ट्रेलरला 2 मिलियनहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. यामुळेच आज ट्विटरवर #2MLikesForBigilTrailer हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.

मुंबई : हिंदी चित्रपटांनाही मागे टाकत सध्या एकाच तमिळ चित्रपटाची चर्चा सुरू आहे... तो चित्रपट म्हणजे बिगिल... तमिळ सुपरस्टार थालापथी विजयमुळेच या चित्रपटाची हवा सुरू आहे. केवळ चार दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या ट्रेलरला 2 मिलियनहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. यामुळेच आज ट्विटरवर #2MLikesForBigilTrailer हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे.

हटके ट्रेलर लॉन्चिंग...
या चित्रपटाचे ट्रेलर इतर चित्रपटाप्रमाणे रिलीज झाले नाही, तर ट्रेलर लॉंचिंगची पद्धतही हटके होती. थालापथीच्या ट्रेलरचे लॉंचिंग झाले थेट थिएटरमध्येच. यासाठी त्याचे असंख्य फॅन्स उपस्थित होते. त्या ट्रेलरमध्ये काहीसे वय झालेला थालापथी विजय एका ठिकाणी बिगले असे घोगऱ्या आवाजात म्हणतो. चेन्नईतल्या एका थिएटरला जणू त्याच्या त्या डायलॉगने आगच लागली. विजयने बिगलेssss असे म्हणताच सगळ्या थिएटरमधल्या पब्लिकने त्याच्या मागून एका सुरात तोच डायलॉग रिपिट केला…

या चित्रपटात विजय एका फुलटबॉलपटूच्या भूमिकेत दिसेल. तसेच तो मुलींच्या फुटबॉल टीमचा कॉचही आहे. तरूणपणी घडलेल्या अनेक दुर्दैवी घटनांचा बदला तो त्याच्या उतारवयात घेतो. या चित्रपटात नयनतारा त्याच्यासोबत दिसेल. मसाला, अॅक्शन आणि मोठी स्टारकास्ट अशा सर्व गोष्टींनी भरलेला हा चित्रपट आहे. 

 

 

 

 

थलपथी विजयची लोकप्रियता यातून दिसत असली, तरी आता ट्रेलर लॉंचिंगचा हा एक नवा ट्रेंड निर्माण होत असल्याचे मत इंडस्ट्रीतले जाणकार व्यक्त करीत आहेत. थलपथी विजयचा 180 कोटी रुपये बजेटचा बिगिल हा मूव्ही एक स्पोर्ट्स अॅक्शनपट आहे. त्याला फूटबॉलची पार्श्वभूमी आहे. त्यात विजयबरोबर नयनताराची जोडी आहे. येत्या 25 ऑक्टोबरला तो तमिळनाडूत रिलिज होत आहे. विजयचा फॅनबेस महाराष्ट्रातसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या या शिट्टीची उत्सुकता महाराष्ट्रातही पाहायला मिळते. 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil movie Bigil trailer have more than 2 million in 4 days