
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सध्या सोशल मीडियावर अनेक प्रसिद्ध व्यक्ती समर्थनार्थ आणि विरोधात मत व्यक्त करत आहेत.
नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सध्या सोशल मीडियावर अनेक प्रसिद्ध व्यक्ती समर्थनार्थ आणि विरोधात मत व्यक्त करत आहेत. यामध्ये बॅलिवूड सेलिब्रीटींचाही समावेश आहे. आता बॅलिवूडबरोबरच टॅालिवूडमधील सेलिब्रेटीही सोशल मिडीयावर व्यक्त होत असून एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींविरोधात राग व्यक्त केला असून त्याचीच चर्चा सुरु आहे.
'गो बॅक मोदी' ट्विटमुळे ओविया चर्चेत
नुकतच तमिळ अभिनेत्री ओविया हेलेनने पंतप्रधान विरोधात ट्विट केले आहे.या ट्विटमध्ये ओवियाने 'गो बॅक मोदी' असे लिहीले आहे. या ट्विटमुळे ती खूप चर्चेत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरूद्ध ट्विट करणारी ही अभिनेत्री कोण याची चर्चा होत आहे. ओविया हेलेन ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिचे पूर्ण नाव हेलेन नेल्सन असे आहे.
कोण आहे ओलिवीया?
ओवियाने तिच्या करियरची सुरूवात मॅाडेलिंगपासून केली. त्यानंतर मॅाडेलिंग क्षेत्रात तिने विषेश स्थान निर्माण केले. 2007 मध्ये कांगारू या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटामध्ये काम केले आहे.
हे वाचा - राधे श्याममधील एका सीनसाठी मोजले दीड कोटी
अपुर्वा, नालाय नमधे, कालवनी, मरिना या चित्रपटांमधून ओविया झळकली आहे. तमिळ बिग बॅासमध्ये ओवियाने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. बिग बॅासमुळे तिला प्रसिध्दी मिळाली. ओवियाला 2011 साली आलेल्या मुथुक मुथागा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा : करीनाला पुत्ररत्न? सैफच्या बहिणीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा
ओविया समाजात घडणाऱ्या घडामोडींबाबत नेहमी सोशल मिडीयावर व्यक्त होत असते. नरेंद्र मोदी तमिळनाडूच्या दौऱ्यावर जाण्याआधी ओवियाने गो बॅक मोदी असे ट्विट केले होते. 13 फेब्रुवारीला हे ट्विट ओवियाने केले. या ट्विटमुळे राजकिय अजेंड्याच्या नावाने जनतेला भडकवणे हा उद्देश असल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या ट्विटमुळे तिला ट्रोलही केलं जात असून ओविया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.