
मनीषवर तामिळनाडू प्रकरणाव्यतिरिक्त बेतिया इथं 7 गुन्हे दाखल आहेत.
Tamil Nadu Violence : न्यायालयाचा आदेश येताच YouTuber मनीषनं पोलिस ठाण्यात केलं आत्मसमर्पण
तमिळनाडूतील हिंसाचार (Tamil Nadu Violence) आणि बिहारी लोकांवरील हल्ल्याच्या संदर्भात दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप असलेला YouTuber मनीष कश्यपनं (Manish Kashyap) आज आत्मसमर्पण केलं.
घरातून जप्तीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, मनीष कश्यपनं जगदीशपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. वृत्तानुसार, मनीषला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलंय. EOU त्याची चौकशी करणार असल्याचं कळतंय.
न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर, अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस मनीष कश्यपच्या घरी पोहोचले. त्याच्या घरावर बुलडोझर चालवत घरातील साहित्य जप्त केलं. मनीष कश्यपचं घर बेतिया येथील माझौलिया पोलीस ठाण्यांतर्गत महना डुमरी गावात आहे.
मनीषवर तामिळनाडू प्रकरणाव्यतिरिक्त बेतिया इथं 7 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 5 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मनीषनं पाटणा उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. याचिका फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. अनेक प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर त्यानं आज आत्मसमर्पण केलं आहे.