'या' अभिनेत्याने सेटवरील तब्बल 400 जणांना भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या

'या' अभिनेत्याने सेटवरील तब्बल 400 जणांना भेट दिल्या सोन्याच्या अंगठ्या

हैद्राबाद : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय याने आपल्या सेटवरील तब्बल 400 जणांना सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या आहेत. विजयचा बिगिल नावाचा सिनेमा दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजयने या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये सहभागी असलेल्या सेटवरील प्रत्येकाला सोन्याची अंगठी भेट दिली. या अंगठीवर सिनेमाचे नाव म्हणजे Bigil असं लिहिलेले आहे.

विजयने दिलेल्या सोन्याच्या अंगठीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विजयचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत आहे. विजयने अचानक दिलेल्या या भन्नाट भेटवस्तूमुळे अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर या अंगठीचा फोटो पोस्ट करत विजयचे अनेकांनी आभारही मानले आहेत. 

दरम्यान, विजयबरोबर या सिनेमामध्ये नयनतारा, जॅकी श्रॉफ, काथीर, डॅनियल बालाजी, योगी बाबू, अर्था अय्यर यासारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमामध्ये पहायला मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com