कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता आनंद कन्नन यांचे निधन

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या एका प्रख्यात अभिनेत्याचं कॅन्सरनं निधन झालं आहे.
कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता आनंद कन्नन यांचे निधन

मुंबई - आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या एका प्रख्यात अभिनेत्याचं कॅन्सरनं निधन झालं आहे. तमिळ अभिनेता आनंद कन्नन असे त्या अभिनेत्याचं नाव आहे. ते ४८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजत होते. त्यांची ती झुंज अपयशी ठरली आहे. त्या आजाराला सामोरं जाताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक वेंकट प्रभु यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यांनी आनंद यांचा एक फोटो शेयर करुन आनंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

९० च्या दशकांत आनंद यांनी आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख टॉलीवूडमध्ये निर्माण केली होती. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैली त्यामुळे ते चाहत्यांमध्ये विशेष प्रिय होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सिंगापूर वसंतम् टीव्हीपासून केली होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या शो मध्ये ते एका होस्टच्या भूमिकेत होते. त्यानंतर ते सन म्युझिकसोबत जोडले गेले. आणि त्यांनी व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केले. तो त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरला. चित्रपट निर्माते वेंकट प्रभु यांच्यासोबत त्यांनी सरोजा नावाच्या चित्रपटात काम केले.

आनंद यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय झालेल्या गायत्री रघुराम यांनी देखील आनंद यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आम्हाला सर्वाना प्रिय असणारा अभिनेता आता आपल्यातून निघून गेला आहे. याचे वाईट वाटते. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य आणण्याचं काम आनंद यांनी केलं होत.

कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता आनंद कन्नन यांचे निधन
'ती बोगस अभिनेत्री', विधू विनोद चोप्रा कुणाबद्दल बोलले?

अभिनेता अशोक कुमार यांनी म्हटले आहे की, आनंद हा एक उत्साही अभिनेता होता. त्याच्यात कमालीची सकारात्मकता होती. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. त्याच्या जाण्यानं मोठी हानी झाली आहे. त्याची पोकळी सहजासहजी भरुन येणारी नाही. आनंद यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com