रुपेरी पडद्याला भुरळ इतिहासाची...

tanaji film like historical stories
tanaji film like historical stories

चित्रपट यशस्वी व्हायचा असेल तर विषय हटके असाच निवडावा लागतो. भारतात दरवर्षी दोनेक हजार चित्रपट बनविले जातात. आता एवढे हटके विषय आणणार कोठून आणि मांडलेला विषय हा यशस्वी होईलच, याची खात्री देता येत नाही. मग अशावेळी एखादा हाताशी असलेला तयार विषय फुलवून मांडणे, हाच मार्ग अनेक निर्माते-दिग्दर्शक निवडताना दिसतात. यात त्यांना सर्वाधिक खुणावतात ते ऐतिहासिक विषय. ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनविणे हे हमखास यशाचे गमक जणू बनले आहे. सध्याही एकापाठोपाठ एक ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटांची लाट सध्या आली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या "पानिपत'नंतर आता अजय देवगणचा "तान्हाजी' हा चित्रपट आज चित्रपटगृहांत दाखल झाला.

हे पण वाचा - भरकटलेल्या `त्या` मुलींना महिलेने पोहोचविले असे घरी.  त्या दोघीही प्रचंड घाबरल्या होत्या. गोंधळल्या होत्या.  त्याचवेळी त्यांना देवधूत भेटला  आणि...

तसं पाहायला गेलं तर ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा ही खूप जुनी आहे. किंबहुना ती आद्य आहे, असेही म्हणायला हरकत नाही. चित्रपटसृष्टीच्या सुरवातीच्या काळात पौराणिकनंतर ऐतिहासिक विषयांवरच चित्रपट बनविले गेले. मराठीत तर शिवचरित्रातील घटनांवर चित्रमालिकाच बनली. नंतरच्या काळातही अधूनमधून इतिहासात चित्रपटसृष्टी डोकावत राहिली. वर्षाला एखादा तरी चित्रपट येतच असतो. आता तर एकामागोमाग एक ऐतिहासिक चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. हिंदीत "मनिकर्णिका', "पानिपत'पाठोपाठ आता "तान्हाजी' आला आहे; तर मराठीत "फर्जंद', "फत्तेशिकस्त'नंतर "हिरकणी' पडद्यावर झळकला. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळते आहे. मराठीबरोबरच बॉलिवूडलाही महाराष्ट्राच्या इतिहासावर चित्रपट बनवावेसे वाटतात, हे अभिमानास्पद आहे.
बॉलिवूडमध्ये आशुतोष गोवारीकर व संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक घटनांवरील चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात माहीर आहेत. भन्साळींनी "बाजीराव मस्तानी', "पद्मावत' या चित्रपटांद्वारे दोन वेगळ्या प्रेमकथांना पडद्यावर आणले; तर आशुतोष गोवारीकर यांनी "जोधा अकबर', "मोहोंजदरो'नंतर आता मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असलेल्या "पानिपत'चा रणसंग्राम कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा -  व्हिडीओ : नव्वदीतही शेतात फिरतंय आवड्या बापूंचं खुरपं... -

ऐतिहासिक चित्रपट बनविताना वाद ओढवून घेण्याचीही तयारी ठेवायला हवी. ऐतिसासिक सत्य मांडताना कोणाच्या तरी भावना दुखावण्याची शक्‍यता असते किंवा नाट्य रंगविण्यासाठी ऐतिहासिक घटनांशी छेडछाडीचाही आरोप केला जातो. भन्साळींना आपल्या चित्रपटांवेळी याचा पुरेपूर अनुभव आला आहे. त्यातल्या त्यात "पद्मावत' वेळचा वाद तर थेट कोल्हापूरशी संबंधित आहे. चित्रीकरणावेळी मसाई पठारावर उभारलेला सेट जाळून टाकण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी इतरत्र चित्रीकरण केले होते. पुढे हा वाद इतका वाढला की भन्साळींना चित्रपटाचे नाव पद्मावती ऐवजी "पद्मावत' करावे लागले. गोवारीकरांनाही "जोधा'च्यावेळी वादाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या वेळी त्यांनी पुरेशी काळजी घेतल्याचे दिसते. आता, आजपासून तान्हाजी मालुसरे यांच्यावरील चित्रपट रुपेरी पडद्यांवर अवतरला आहे. अजय देवगण याने "अनसंग वॉरियर्स' ही चित्रपटांची मालिकाच बनविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातील "तान्हाजी' हा पहिला चित्रपट असून, हे गौरवास्पदच असेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com