तन्मय भटने घटविले 109 किलो वजन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई- नव्या वर्षाची चाहूल लागताच वर्षअखेरीस सर्वजण नवनवीन संकल्प सोडण्याच्या तयारीत असतात. त्यापैकी अनेकांच्या 'हिटलिस्ट'वर असते ते 'वेट लॉस' अर्थात वजन घटविणे. तुम्ही संकल्प करण्याआधीच अशक्य वाटणारा हा संकल्प पूर्ण केलाय तन्मय भटने. त्याने 19 महिन्यांत तब्बल 109 किलो वजन कमी केलंय. 

विनोदी कलाकार तन्मय भट हा एका टीव्ही शोमुळे वादग्रस्त ठरला होता. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा अपमानास्पद व्हिडिओ तयार केल्यामुळे चर्चेत आला होता. मात्र, आता त्याने केलेली ही कामगिरी वजनदार व्यक्तींना प्रोत्साहित करणारी आहे. 
याशिवाय अधिक तंदुरुस्त बनण्याचा संकल्प करून त्यासाठी आणखी तीन महिन्यांचे वेळापत्रक त्याने आखले आहे.  

अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी मेहनत घेताना दिसतात. वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार कमी करणे, कसरतीचा आधार घेणे असे अनेक उपाय करतात. मात्र, तंत्रशुद्ध पद्धतीने तन्मयने 109 किलो वजन कमी करून दाखविले आहे. अनेकांना अशक्य वाटणारे काम योग्य नियोजनाने हे साध्य करता येऊ शकते. हेच तन्मयने दाखवून दिले आहे. 

Web Title: Tanmay Bhat's Colossal Weight Loss