"तनु वेड्‌स मनु 3' मधून कंगनाचा पत्ता कट! 

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

आनंद राय यांनी "तनु वेड्‌स मनु' चे दोन भाग बनवले आणि ते यशस्वी झाले. आता ते या चित्रपटाचा तिसरा भाग बनविण्याच्या तयारीत आहेत; पण कंगना आणि आर. माधवन ही जोडी आता तुटणार आहे. कारण "तनु वेड्‌स मनु 3' या चित्रपटात कंगनाचा पत्ता कट होणार अशी चिन्हं आहेत; पण असे का केले असावे. कंगना अजूनही याबाबत काहीच बोललेली नाही. ती बोलेल तेव्हाच काय तो खुलासा होईल. कंगनाने "तनु वेड्‌स मनु'च्या दोन्ही भागांमधून उत्तम कामगिरी केली होती. तिचा अभिनय पाहून प्रेक्षक चकित झाले होते; मात्र "तनु वेड्‌स मनु'च्या तिसऱ्या भागासाठी कंगनाची निवड होणार नाही.

आनंद राय यांनी "तनु वेड्‌स मनु' चे दोन भाग बनवले आणि ते यशस्वी झाले. आता ते या चित्रपटाचा तिसरा भाग बनविण्याच्या तयारीत आहेत; पण कंगना आणि आर. माधवन ही जोडी आता तुटणार आहे. कारण "तनु वेड्‌स मनु 3' या चित्रपटात कंगनाचा पत्ता कट होणार अशी चिन्हं आहेत; पण असे का केले असावे. कंगना अजूनही याबाबत काहीच बोललेली नाही. ती बोलेल तेव्हाच काय तो खुलासा होईल. कंगनाने "तनु वेड्‌स मनु'च्या दोन्ही भागांमधून उत्तम कामगिरी केली होती. तिचा अभिनय पाहून प्रेक्षक चकित झाले होते; मात्र "तनु वेड्‌स मनु'च्या तिसऱ्या भागासाठी कंगनाची निवड होणार नाही. तनु वेड्‌स मनु सीरिजचे दिग्दर्शक आनंद रायही या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाही म्हणे. या सीरिजचे लेखक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, अशी चर्चा आहे. यामुळे आता "तनु वेड्‌स मनु'मधील नवीन जोडी कोण असेल, याबद्दल भलतीच उत्सुकता आहे. 

Web Title: "Tanu weds Manu 3 'from kangana's card cut !