तनुश्रीनेच दिली मारण्याची सुपारी : राखी सावंत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

राखी सावंत आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता हा वाद काही केल्या शांत होत नाही. मीटू मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद अजून चालूच आहे. तनुश्रीनेच मला मारण्याची सुपारी दिली असा आरोप आता राखी सावंतने केला आहे. 

मुंबई : राखी सावंत आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता हा वाद काही केल्या शांत होत नाही. मीटू मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद अजून चालूच आहे. तनुश्रीनेच मला मारण्याची सुपारी दिली असा आरोप आता राखी सावंतने केला आहे. 

हरियाणातील पंचकुला येथे रेसलिंगच्या बिग फाईटचं आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटू रैवलनला आव्हान देत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या रैवलननं राखीला हवेत उचलून जमीनीवर आदळलं.

यानंतर राखी रुग्णालयात दाखल झाली. यानंतर उपचारानंतर राखीनं तनुश्रीनेच आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला. मी कुस्तीपटूला आव्हान दिलं नाही, मी डान्स करत होते तेव्हा तिनं मला उचलून आदळलं असे तिने सांगितले आहे. तिने याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

पुढे राखी सावंतने तनुश्रीला आव्हान देत म्हटले आहे की, ती तनुश्रीला सोडणार नाही. याचा ती बदला घेईल, यामुळे राखी सावंत आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता हा वाद आणखीनच विकोपाला जाण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanushree Dutta Hiring The Wrestler To Kill Me Claim Rakhi Sawant